मोठी बातमी : राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे संकेत

सार्वजनिक ठिकाणी, लोकल ट्रेनमध्ये कोरोनाच्या गाईडलाईन्सचे पालन करावे, असेही सांगितले जात आहे. (Vijay Wadettiwar Night Curfew)

मोठी बातमी : राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे संकेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 5:44 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. यानुसार राज्य सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबतचे संकेत दिले. (Night Curfew will implemented in maharashtra said Vijay Wadettiwar)

विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जर स्थिती सुधारली नाही, तर महाराष्ट्रात संध्याकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला जाऊ शकतो.

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्य सरकारकडून कोरोनाचे नियम पालन करा, असे आवाहन केले जात आहे. मात्र सर्वसामान्य जनतेकडून हे नियम पायदळी तुडवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार केला जात आहे. सर्वसामान्यांनी कोरोनाच्या गाईडलाईन्स पाळाव्यात, यासाठी अनेक ठिकाणी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी, लोकल ट्रेनमध्ये कोरोनाच्या गाईडलाईन्सचे पालन करावे, असेही सांगितले जात आहे.

नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार का?

सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे, गर्दीत जाणे टाळणे याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच लग्नाचे हॉल किंवा विवाह समारंभांशी संबंधित कार्यालयांवरही कारवाई सुरु करण्यात आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात साधारण संध्याकाळी 6 ते सकाळी 9 पर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सरकारकडून केले जात आहे. विशेष म्हणजे जर कोरोनाच्या रुग्णांमध्ये अशाचप्रकारे सातत्याने वाढ झाली, तर मग पूर्णपणे लॉकडाऊनही केले जाऊ शकतं.  (Night Curfew will implemented in maharashtra said Vijay Wadettiwar)

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र कितीही सांगितलं तरी लोक विनामास्कचे फिरत आहेत. कुठलीही काळजी लोक घेत नाही. त्यामुळे आता काही कठोर पावलं उचलावी लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, मास्क लावणं, गर्दी टाळणं, हे नियम नागरिकांनी पाळावेत. लग्न समारंभात गर्दी टाळण्यासाठी आम्ही आता मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचं सुरु केलं आहे. साधारणत: संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरु आहे. जर लोकांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते,” असे विजय वेडेट्टीवार म्हणाले.

सरकारकडून संपूर्ण राज्यात एकाच वेळी नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो का? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आला होता. यावर वडेट्टीवार म्हणाले, सध्या मुंबईसह इतर सर्व ठिकाणी नाईट कर्फ्यू लावण्याबाबत विचार करण्यात आलेला नाही. पण संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार देण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शक्य त्या उपाययोजना राबवा, असे आदेश देण्यात आले आहेत.

प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या, संसर्गाचा प्रसार होण्याची गती, बाजारपेठेत किंवा सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी या सर्व बाबी पाहून नाईट कर्फ्यूबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच जर नाईट कर्फ्यू लागू करुनही परिस्थिती सुधारली नाही, तर कठोर पावलं उचलावी लागतील, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.  (Night Curfew will implemented in maharashtra said Vijay Wadettiwar)

संबंधित बातम्या : 

ऊर्जामंत्री नितीन राऊतांचं सामाजिक भान, कोरोनामुळे मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ स्थगित

नवी मुंबईत कोरोना धोका वाढला, महापालिका आयुक्तांचे कठोर कारवाईचे आदेश

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.