रविवारी नऊ तासांचा मेगाब्लॉक, पुणे, नाशिककडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द
मुंबई : मध्य रेल्वेवर मुंबईत रविवारी (20 जानेवारी) तब्बल नऊ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. परळ रेल्वे स्थानकाजवळ यार्ड रिमोल्डिंग, प्लॉट फार्म दुरुस्ती आणि सिग्नल प्रणाली अत्याधुनिक करण्याबरोबरच इतर दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे […]
मुंबई : मध्य रेल्वेवर मुंबईत रविवारी (20 जानेवारी) तब्बल नऊ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. परळ रेल्वे स्थानकाजवळ यार्ड रिमोल्डिंग, प्लॉट फार्म दुरुस्ती आणि सिग्नल प्रणाली अत्याधुनिक करण्याबरोबरच इतर दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
या मेगाब्लॉकमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर आणि नाशिक-पुण्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे. रेल्वेकडून काही महत्त्वाच्या गाड्या या मेगाब्लॉक दरम्यानर रद्द केल्या आहेत.
रेल्वेकडून रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस (२२१०२ अप)
- मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस (२२१०१ डाऊन)
- मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस (१२११० अप)
- मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस (१२१०९ डाऊन)
- पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस (११०१० अप)
- मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस (११००९ डाऊ)
- पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (१२१२४ अप)
- मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस (१२१२३ डाऊन)
रविवारी सुट्टीमुळे अनेकजण फिरण्यासाठी घराबाहेर जातात. मात्र या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. विशेष म्हणजे मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही याचा फटका बसणार आहे. मुंबईवरुन नाशिक-पुण्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.