महालक्ष्मी एक्सप्रेसमधून 9 गर्भवती महिलांना बाहेर काढण्यात यश

बदलापूर आणि वांगणीच्यामध्ये अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये तब्बल 9 गर्भवती महिला अडकल्याची माहिती समोर आली आहे.

महालक्ष्मी एक्सप्रेसमधून 9 गर्भवती महिलांना बाहेर काढण्यात यश
Follow us
| Updated on: Jul 27, 2019 | 2:01 PM

ठाणे : बदलापूर आणि वांगणीमध्ये अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये तब्बल 9 गर्भवतींना बाहेर काढण्यात NDRF टीमला यश आलं आहे. या मधील एका महिलेला रुग्णालयात हलवण्याचे कार्यवाही सुरु आहे. महालक्ष्मी एक्सप्रेसमधून आतापर्यंत 500 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. घटनास्थळी पालकमंत्री एकनाथ शिंदेही दाखल झाले आहेत.

एनडीआरएफ, नौदल आणि वायूदलाकडून बचावकार्य सुरु

 12 तासानंतर एक्सप्रेसमध्ये अडलेल्या लोकांना बचावासाठी एनडीआरएफ, नौदल आणि वायूदलाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. प्रवाशांच्या बचावासाठी 2 हेलिकॉप्टरही रवाना करण्यात आलं आहे. तसेच बचावकार्यासाठी 8 बोटही रवाना करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण 500 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये 700 प्रवासी अडकले

मुसळधार पावसामुळे कर्जत/खोपोली ते बदलापूर लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. तर या पावसाची फटका महालक्ष्मी एक्सप्रेलाही याचा बसला आहे. बदलापूर येथे रेल्वे ट्रॅकवर 2 फुटांपर्यंत पाणी साचल्याने महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बदलापूर ते वांगणी स्थानकादरम्यान थांबवण्यात आली आहे. या एक्सप्रेसमध्ये 700 प्रवासी अडकले आहेत. या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पोलीस प्रशासनापासून इतर सामाजिक संस्थांना मदत करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

पुढील 24 तासात आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वेध शाळेकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पलाघर, रायगड, रत्नागिरी जिल्हात सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.