या कारणाने नव्वद टक्के सरकते जिने असतात बंद, रेल्वे सर्वेक्षणात उघड
मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एकूण 150 सरकते जिने बसवले आहेत, आता आणखी मुलुंड, विक्रोळी, दिवा आणि मुंब्रा स्थानकात सरकते जिने बसविण्याची योजना आहे.
मुंबई : मुंबई उपनगरीय मार्गावरील रेल्वेचे सरकत्या जिन्यांच्या ( escalator ) वापर रेल्वे प्रवाशांना ( passenger ) करता येत नाही. बहुतांश वेळा ते बंदच असतात. या सरकत्या जिन्यांचा नीट वापर केला जात नाही. त्यावरून अवजड सामानाची वाहतूक केली जाते. तसेच अनेक वेळा तर काही खोडसाळ मंडळीकडून त्यांचे पॅनिक बटण दाबले जात असल्याने ते बंद असतात असा अजब तर्क रेल्वेच्या सर्वेक्षणात निघाला आहे. मध्य रेल्वेने ( central railway ) आता यावर उपाय योजन्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत आपल्या अगदी एअरपोर्टसारखे सरकते जिने बसविण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी आणि अपंगांना यातून दिलासा मिळत आहे. परंतू अनेक वेळा हे सरकते जिने बंद अवस्थेत असल्याचे दिसत असते. परंतू , रेल्वेने केलेल्या सर्वेक्षणात हे जिने पॅनिक बटण किंवा इमर्जन्सी बटण दाबल्याने बहुतांश वेळा बंद असतात असे उघडकीस आले आहे.
सरकते जिने अनवधानाने किंवा जाणीवपूर्वक इमर्जन्सी बटण बंद झाल्याने हे सरकते जिने ठप्प झालेले असतात असे आमच्या सर्वेक्षणात उघड झाल्याचे रेल्वेने म्हटले आहे. प्रवासी मजा म्हणून किंवा जाणीवपूर्वक खोडसाळपणा करीत असतात. त्यामुळे नव्वद टक्के वेळा हे स्टॉप बटण दाबल्यानेच सरकते जिने ठप्प असतात असे उघड झाले असल्याचे मध्य रेल्वेचे मुंबई डिविजनचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी ‘मिडे ला’ सांगितले. आम्ही सरकत्या जिन्यांच्या तक्रारीचा अभ्यास केला, त्यावेळी ते बंद पडण्याल्याचा घटनांमध्ये नव्वद टक्के घटना कोणीतरी स्टॉप बटण चुकून किंवा जाणीव पूर्वक दाबल्याने घडल्या आहेत.
मॅकनिझम बदलण्याचा प्रयत्न
ज्यावेळी सरकते जिने बंद असल्याचे समजते त्यावेळी टेक्निशयन बोलवले जाते, त्यानंतर टेक्निशियन सरकत्या जिन्याखालील केबिन उघडून हा जिना पुन्हा करतात. त्यामुळे आता आम्ही हे मॅकेनिजम बदल्याचा प्रयत्न करणार असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी सांगितले. सरकत्या जिन्यांचे बटण जर काही अपघात घडला तर लागलीच तो बंद करता यावा यासाठी नजिकच असते. हे इमर्जन्सी बटण नवख्या प्रवाशांकडून चुकून दाबले जाते किंवा काही खोडकर तरूणही ते मुद्दामहून बंद करीत असतात. परंतू हेच बटण दाबल्याने जिना पुन्हा सुरू होत नाही, तर त्यासाठी केबिन उघडावे लागते.
150 सरकते जिने
काही स्थानकातील स्टॉप बटण पॅनिक बटण सरकत्या जिन्याच्या सुरूवातीलाच वरच्या बाजूला बसवलेले आहे. तर काही स्थानकात बसवलेल्या सरकत्या जिन्यांमध्ये खालच्या बाजूला एक फूट अंतरावर पॅनिक बटणाची जागा आहे. त्याचा फायदा घेत खोडसाळपणा केला जात असतो असे सूत्रांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एकूण 150 सरकते जिने बसवले आहेत, आता आणखी मुलुंड, विक्रोळी, दिवा आणि मुंब्रा स्थानकात सरकते जिने बसविण्याची योजना आहे.