मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला करोडोंचा चुना लावून (Nirav Modi Auction) परदेशात पसार झालेल्या नीरव मोदीच्या मुलाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. नीरव मोदीचा मुलगा रोहिन याने महागडी चित्रं आणि काही वस्तूंच्या लिलावाला स्थगिती द्यावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळत नीरव मोदीला चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे उद्या (5 मार्च) या चित्रांसह काही वस्तूंचा लिलाव केला जाणार आहे.
नीरव मोदीने भारतात (Nirav Modi Auction) पंजाब नॅशनल बँकेला 13000 कोटी रुपयांचा चुना लावला होता. याबाबत गुन्हा दाखल होण्यापूर्वी तो देशाबाहेर पसार झाला. यानंतर अंमलबजावणी संचलनालय (ED) त्याचे बंगले, महागड्या गाड्या यासर्व गोष्टींवर कारवाई केली होती. ईडीकडून फरार नीरव मोदीच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आला. तर काही मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार होता.
मात्र याबाबत नीरव मोदीच्या मुलगा रोहिन मोदी याने आक्षेप घेतला. रोहिन हा लहान असताना नीरव मोदी याने एका ट्रस्ट स्थापन केला होता. लिलाव होणारी काही चित्र रोहिनच्या ट्रस्टची आहे. 2006 मध्ये ही चित्र घेतली होती, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता.
पीएनबी बँकेचा घोटाळा 2011 मध्ये झाला होता. त्यामुळे या चित्रांचा घोटाळ्याशी काहीही संबंध नाही. जेव्हा हे ट्रस्ट बनवण्यात आला. तेव्हा याचिकाकर्ते हा अल्पवयीन होता. असा युक्तीवाद रोहिन मोदी यांचे वकील अमित देसाई यांनी (Nirav Modi Auction) केला.
यातील काही वस्तू आधीच जप्त केल्या. या लिलावाबाबतच्या नोटीस काढण्यात आल्या. अनेक जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आल्या. उद्या लिलाव आहे आणि आज हे कोर्टात येत आहेत. वस्तू जप्त केल्यापासून यांनी कधीही आक्षेप घेतला नाही, असा युक्तीवाद केंद्र सरकारचे वकील अनिल सिंग आणि ईडीचे वकील हितेन वेनेगावकार यांनी केला.
यावर निकाल देताना मुख्य न्यायमूर्ती बी पि धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बोरकर यांनी रोहिन मोदी यांची याचिका फेटाळून लावली.
या ट्रस्टने न्यायालयात कोणत्याही प्रकारचा संबंध साधलेला नाही. ट्रस्टशी संबंधित नीरव मोदी, त्याची पत्नी अथवा इतर लाभार्थी कोर्टात आलेले नाही. याचिकाकर्ते शेवटच्या क्षणी कोर्टात आले. अशा परिस्थिती आम्ही अंतरिम आदेश देऊ इच्छित नाही, असं कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
नीरव मोदीच्या महागड्या पेंटींगसह जवळपास 112 मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. यात प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांनी 1935 मध्ये करण्यात आलेली बॉयज विथ लेमन चित्र, एमएफ हुसैन यांनी काढलेल्या राजा रवी वर्मासह इतर पेंटिंग्सचा समावेश आहे. यातील प्रत्येक पेंटींगची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या व्यतिरिक्त नीरव मोदी याचे हिरेजडीत घड्याळं, रोल्स रॉयस गोस्ट, पोर्शे, पानामेरा यासारख्या महागड्या गाड्यांचाही लिलाव (Nirav Modi Auction) होणार आहे.