भैय्या, ये दिवार टुँटती क्यू नही? निरव मोदीचा बंगला ब्लास्ट करुन पाडणार!

मुंबई : पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबीचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला डायमंड किंग निरव मोदीचा रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये आलिशान बंगला आहे. अनेक नियमांचं उल्लंघन करुन हा बंगला बांधण्यात आलाय. पण आता या बंगल्यावर कारवाई करण्यासाठी सुरुवात तर केलीय, पण प्रशासनाची डोकेदुखी झालीय. कारण, हे एवढं पक्क बांधकाम आहे, की ते आता स्फोट […]

भैय्या, ये दिवार टुँटती क्यू नही? निरव मोदीचा बंगला ब्लास्ट करुन पाडणार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई : पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबीचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला डायमंड किंग निरव मोदीचा रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये आलिशान बंगला आहे. अनेक नियमांचं उल्लंघन करुन हा बंगला बांधण्यात आलाय. पण आता या बंगल्यावर कारवाई करण्यासाठी सुरुवात तर केलीय, पण प्रशासनाची डोकेदुखी झालीय. कारण, हे एवढं पक्क बांधकाम आहे, की ते आता स्फोट करुन पाडलं जाणार आङे.

मुंबई उच्च न्यायालयाने हा बंगला पाडण्यासाठी ब्लास्ट करण्याची परवानगी दिली आहे. निरव मोदी यांचा बंगला बेकायदेशीर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बंगल्याचं बांधकाम पक्क असल्याने ते हतोड्याने तोडता येत नाही. हा बंगला सुरुंग लावून तोडण्याच्या परवानगीसाठी हायकोर्टात परवानगी मागण्यात आली होती. यावेळी ईडीने या बंगल्यात अनेक मौल्यवान वस्तू असल्याने त्या आम्हाला जप्त करायच्या आहे, यासाठी अर्ज केला आहे. त्यावर कोर्टाने दोन आठवड्यात वस्तू जप्त करण्याची मुदत दिली आहे. त्याच प्रमाणे बंगला ब्लास्ट करून तोडण्यास परवानगी दिली.

निरव मोदीचा बंगला पडता पडेना

अलिबागमधील किहीम समुद्रकिनारी असलेल्या बंगल्यावर तोडक कारवाईला सुरूवात झालीय. सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करून बंगला बांधल्याप्रकरणी 25 जानेवारीपासूनच प्रत्यक्षरित्या या कारवाईला सुरूवात झाली. पण, आजवर निरव मोदीच्या या बंगल्याचा एक कोपराही तोडण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही. मोठमोठी अवजारं, जेसीबी, पोकलेन आणि कामगारांचा मोठा फौजफाटा आणूनही ‘आखिर ये दिवारे टुँटती क्यो नही’ असा सवाल प्रशासनाला पडल्याचं दिसतंय.

कसा आहे हा आलिशान बंगला?

किहीम बीचपासून 50 मीटर अंतरावर निरव मोदीचा बंगला आहे. या बंगल्याच्या बाजूलाच काही अंतरावर अंबानी, रतन टाटा आणि विजय मल्ल्या यांचे बंगले आहेत. या अलिशान बंगल्यात पाच बेडरूम, हॉल, किचनचा समावेश आहे. त्यासोबत अडीच लाख लिटरचे दोन मोठे स्विमिंग पूल आहेत. बंगल्यात कोट्यवधी रूपयांचे फर्निचर, महागडे सोफे होते, जे ईडीने जप्त केले. त्यासोबत निजामकडून घेतलेला एक महागडा गालिचा, गाडीही जप्त करण्यात आली आहे. जवळपास दोन टन वजनाची धातूची ऐतिहासिक बुद्धमूर्ती अजूनही बंगल्यातच आहे. या मूर्तीचं काय करायचं यासंदर्भात प्रशासनाने कोर्टाला विचारणा केली.

बंगला पडत का नाही?

निरव मोदीच्या या बंगल्याची प्रत्येक भिंत ही फक्त काँक्रिट घालून बनवण्यात आलीय. अशा या निरव मोदीच्या बंगल्याला पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून झाले. पण, बंगला मात्र जमीनदोस्त झालाच नाही. तोडक कारवाई करत असताना अलिबाग प्रशासनावर पहिल्यांदाच अशी नामुष्की ओढावली. उपलब्ध साधनांमध्ये बंगला पाडता येणं शक्य नाही हे स्थानिक प्रशासनाला कळलं. म्हणूनच या मजबूत अशा बांधकामाला पाडण्यासाठी शास्त्रज्ञांची मदत घेण्यात आली. दोन दिवसांपूर्वी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापीठातील अभियंत्‍यांनी या बंगल्‍याची चार तास पाहणी केली. त्‍यांनी हे बांधकाम जेसीबीच्‍या सहाय्याने तोडण्‍याऐवजी नियंत्रित स्‍फोट पद्धतीचा अवलंब करावा, असा अभिप्राय दिला. त्‍यानुसार नियंत्रित स्‍फोटाने हे बांधकाम तोडण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

बांधकाम पाडण्‍यापूर्वी या बंगल्‍यातील झुंबरस न्‍हाणीघर किंवा शौचालयातील किंमती वस्‍तू, इतर साहित्‍य बाजूला करून त्‍याचा लिलाव केला जाणार आहे. त्‍यासाठी उच्‍च न्‍यायालयाची परवानगी मागितली जाणार आहे. पण, सध्या तरी हा बंगला एकदाचा कधी पडणार आणि ओढवलेल्या नामुष्कीतून सुटका कधी होणार याचीच चिंता प्रशासनाला पडल्याचं चित्रं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.