बीकेसीमधील कोविड 19 केंद्रालाही चक्रीवादळाचा जोरदार फटका, नितेश राणेंकडून व्हिडीओ पोस्ट करत टीका
कोरोना बाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) कोविड 19 उपचार केंद्राला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे (Nisarga Cyclone effect on COVID 19 care centre BMC).
मुंबई : कोरोना बाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) कोविड 19 उपचार केंद्राला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे (Nisarga Cyclone effect on COVID 19 care centre BKC). विशेष म्हणजे या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊनच मंगळवारी (2 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती दिली होती. असं असलं तरी आमदार नितेश राणे यांनी बीकेसीतील या केंद्राचे नुकसान झाल्याचे व्हिडीओ पोस्ट करत जोरदार टीका केली आहे.
निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारीच (2 जून) राज्य सरकारच्या तयारीची माहिती जनतेला दिली होती. तसेच आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी त्यांनी बीकेसीमध्ये कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना सुरक्षेची खबरदारी म्हणून इतर ठिकाणी हलवण्यात आल्याचंही सांगितलं होतं. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेऊन राज्य सरकारने बीकेसीमध्ये महत्त्वकांक्षी कोविड 19 उपचार केंद्राची उभारणी केली होती. स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनेकदा त्याचा उल्लेख करुन महाराष्ट्राची पूर्ण तयारी असल्याचं म्हटलं होतं. मात्र, कोरोनासोबतच अचानकपणे महाराष्ट्रात धडकलेल्या या चक्रीवादळाच्या संकटाने ही बीकेसीतील ही तयारी विस्कळीत केली आहे.
Jumbo isolation centre at BKC goes down the drain in just few hours n so does the taxpayers money which was misused here by Penguin T gang!! pic.twitter.com/SVzCwvpfy3
— nitesh rane (@NiteshNRane) June 3, 2020
आमदार नितेश राणे यांनी देखील बीकेसीतील कोविड 19 उपचार केंद्राच्या नुकसानीचा व्हिडीओ पोस्ट करत थेट उल्लेख न करता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “बीकेसीमधील भव्य विलगीकरण केंद्र काही तासात कोलमडले. यासह करदात्यांच्या पैशांचाही पेंग्विन टी गँगकडून दुरुपयोग झाला आहे. स्वतः सुरक्षा रक्षकांनी हे केंद्र पडण्याआधी रुग्णांना येथून हलवण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे यावर इतके कोट्यावधी रुपये का खर्च करण्यात आले? कोविडच्या नावाखाली हा स्पष्टपणे करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग आहे. या सर्व प्रकाराची चौकशी व्हायला हवी.”
Here the security guard clearly says that the patients where shifted before all this falls on them ! So why crs of money spent on this anyways ? There should be a enquiry on all this which has been a clear misuse of taxpayers money in the name of COVID! pic.twitter.com/XZRfR845wC
— nitesh rane (@NiteshNRane) June 3, 2020
नितेश राणे यांनी यावेळी घाटकोपर येथील राम नगरचा एक व्हिडीओ शेअर करत मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरही ताशेरे ओढले. बीएमसीने नालेसफाईसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले. त्याबदल्यात आपल्याला काय मिळाले असं म्हणत त्यांनी रस्त्यावरुन वाहणारे सांडपाणी आणि त्यात वाहणाऱ्या गाड्यांचा व्हिडीओ शेअर केला. यात नागरिकांची होणारी धावपळ देखील दिसत आहे.
BMC spends crs on Nallah safai .. n this is what we get ! Ghatkopar Ram Nagar today ! pic.twitter.com/9Hs7WjcoHy
— nitesh rane (@NiteshNRane) June 3, 2020
संबंधित बातम्या :
CYCLONE NISARGA LIVE | मुंबईवरचं संकट टळलं, तरीही खबरदारी घेऊ : महापौर
Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळ घोंघावलं, पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
Cyclone Nisarga | मुंबई-अलिबागमध्ये झाडं कोसळली, पुण्यात धावत्या कारवर झाड पडले, जीवितहानी नाही
PHOTO | झाडांची पडझड, पत्रे उडाले, ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं रौद्र रुप
Nisarga Cyclone effect on COVID 19 care centre BKC