ग्रहशांती पूजेत राधिकाचा मराठमोळा लुक, नीता अंबानी यांचीही दिलखेच पोज
राधिका मर्चंट आणि तिच्या कुटुंबाचे नीता अंबानी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये नीता अंबानी यांच्या पोजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी राधिका मर्चंट ही सुद्धा सुंदर स्मितहास्य करताना दिसली.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. 5 जुलै रोजी या जोडप्याने एका भव्य संगीत पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलीवूड आणि क्रीडा जगतातील जवळजवळ सर्वच दिग्गजांनी भाग घेतला होता. लग्नापूर्वी अंबानी कुटुंबाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्यासाठी गृहशांती पूजेचे आयोजन केले होते. या पूजेतील राधिका मर्चंट आणि तिच्या कुटुंबाचे नीता अंबानी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये नीता अंबानी यांच्या पोजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी राधिका मर्चंट ही सुद्धा सुंदर स्मितहास्य करताना दिसली.
सोमवारी 8 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्यासाठी गृहशांती पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या फंक्शनमधून समोर आलेल्या फोटोंमध्ये नीता अंबानी आणि राधिका मर्चंटची आई शैला वीरेन मर्चंट कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहे. शैला वीरेन मर्चंट यांनी पूजेसाठी सोनेरी रंगाची पारंपारिक साडी नेसली होती. राधिका मर्चंट हिने यावेळी मराठमोळी नथ घातली होती. ग्रहशांती पूजेत तिने चक्क मराठी लुक केला होता. पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये राधिकाने खास दागिने घातले होते. तिच्या या लुकची बरीच चर्चा होत आहे. तर राधिकाची बहिण अंजली हिने लाल रंगाची घरचोला साडी नेसली होती. त्याच्यावर गोल्डन रंगाचा ब्लाउज घातला होता आणि भरगच्च ज्वेलरी घातली होती.
राधिका मर्चंट हिचे आई वडील विरेन मर्चंट आणि शैला मर्चंट हे कच्छ गुजरातचे आहेत. वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांना राधिका मर्चंट आणि अंजली मर्चंट या दोन मुली आहेत. अंजली मर्चंटही या पूजेत दिसली. पूजा संपल्यानंतर नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी संपूर्ण अंबानी आणि मर्चंट कुटुंबासोबत फोटो काढले. पूजेनंतर परफॉर्म करणाऱ्या गायकांसोबतही त्यांनी फोटो काढले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलैला विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र, मार्च महिन्यापासूनच प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. दरम्यान, मुंबईत होणाऱ्या या लग्नासाठी अनेक मोठे उद्योगपती आणि नामवंत व्यक्ती मुंबईत दाखल होत आहेत.