फ्रंटलाईन वर्कर्सचं श्रेय महापालिकेनं मिरवायचं, सेनेचं हे धोरण निंदनीय, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
महापालिकेतील वस्तुस्थिती तुमच्यापासून लपवली गेली असेल याची मला खात्री आहे म्हणूनच हे वास्तव तुमच्यापुढे मांडत आहे, असं नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कोरोना काळातील महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका केलीय. कोरोना काळात नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निर्बंधातून जनतेला मेटाकुटीला आणल्याचं राणे म्हणाले आहेत.
आरोग्य सेवकांच्या नशिबी फरपट
नितेश राणे यांनी दवाखान्यांना लागणाऱ्या आगी, ऑक्सिजन अभावी तफडून मेलेली जनता, ऑक्सिजन गळतीमुळं आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात फ्रटलाईन वर्कर्स, कोविड वॉरिअर्स यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करता सामान्य नागरिकांची सेवा केली त्यांच्या नशिबी आघाडी सरकारनं फरपट आणून ठेवल्याचं नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
. @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/LovI6USL4H
— nitesh rane (@NiteshNRane) November 30, 2021
94 हजार कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस बाकी
महाविकास आघाडी सरकार ज्या फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवावर राजकीय स्वार्थ साधतं त्या फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण अद्याप पूर्ण न झाल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. 94 हजार कर्मचाऱ्यांना एकच डोस दिला गेला आहे. मुंबई महापालिका आपल्याच कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसविषयी हलगर्जी आणि उदासीन असल्याचं नितेश राणे यांनी त्यांच्या पत्रात नमूद केलं आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिका आपल्या नाकर्तेपणाच पाप झाकण्यासाठी सगळ खापर कोरोनावर फोडत असल्याची टीका नितेश राणे यांनी केलीय.
मुंबई महापालिकेनं आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणाची मोहिम सुरु केल्यानंतर 7 लाख 56 हजार 539 डोस देण्यात आले. त्यामध्ये 4 लाख 25 हजार 464 जणांना केवळ पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 3 लाख 31 हजार 75 जणांचे डोस पूर्ण झाले आहेत. 94 हजार 389 जणांना दुसरा डोस दिला गेला नसल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
वस्तुस्थिती तुमच्यापासून लपवली गेली असेल
फ्रंटलाईन वर्कर्सनी केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेनं मिरवायचं हे शिवसेनेचे स्वार्थी धोरण अत्यंत निंदनीय असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. महापालिकेतील वस्तुस्थिती तुमच्यापासून लपवली गेली असेल याची मला खात्री आहे म्हणूनच हे वास्तव तुमच्यापुढे मांडत आहे, असं नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. निदान फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी यांनाही ठाकरे सरकार त्यांच्यासोबत संधीसाधूपणाच राजकारण करत नाही ना ? अस वाटू नये, असा खोचक टोला नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात लगावला आहे.
इतर बातम्या:
आ देखें ज़रा किसमें कितना है दम; नवाब मलिक यांचं प्रवीण दरेकरांना ओपन चॅलेंज
Nitesh Rane letter to Uddhav Thackeray and said BMC not take advantage of contribution of Health and Frontline workers