सुशांतसिंह राजपूतच्या पोस्टमॉर्टेमवेळी ‘ही’ व्यक्ती उपस्थित, नितेश राणेंनी शेअर केला Video, म्हणाले बेबी पेंग्विन….
रुपकुमार शाह यांनी पोस्टमॉर्टेम रिपोर्टवेळी गडबड झाल्याचा दावा केल्यानंतर या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे.
मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput) मृत्यू प्रकरण आता आणखीच तापण्याची चिन्ह आहेत. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नुकताच यासंदर्भात एक व्हिडिओ (Video) शेअर केलाय. सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह पोस्टमॉर्टेमला नेला जात असतानाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केलाय. यात तो मृतदेह घेऊन जाणारे रुपकुमार शाह दिसत असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नसून हत्या झाली असावी, असा दावा पोस्टमॉर्टेमच्या वेळी उपस्थिती रुपकुमार शाह यांनी केलाय. कारण मृतदेहावर बऱ्याच जखमा होत्या, असेही शाह यांनी म्हटले आहे. रुपकुमार शाह हे पोस्टमॉर्टेमच्या वेळी उपस्थित होते,हे दर्शवण्यासाठी नितेश राणेंनी नुकतंच एक ट्विट केलंय.
नितेश राणेंचं ट्विट काय?
शवागृहात सेवक म्हणून काम करणाऱ्या रुपकुमार शहा यांनी सुशांतची हत्याच होती असा दावा केलाय. रुपकुमार शाह 13 ते 14 जून 2020 ला कूपर रुग्णालयातल्या शवागृहात कर्तव्यास होते, हे सांगण्यासाठी नितेश राणेंनी ट्विट केलंय. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल आणि आता बेबी पेंग्विन दूर नाही, असा इशारा त्यांनी दिलाय.
It’s clear that Roop Kumar shah was the man carrying SSR s body.. He was there during the PM.. the truth is finally coming out.. Ab baby penguin door nahi hai.. Justice will be done! pic.twitter.com/RiQo0PVeuR
— nitesh rane (@NiteshNRane) January 2, 2023
शाह यांना विशेष सुरक्षा
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रूपकुमार शाह यांना प्रमुख साक्षीदार मानलं जातंय. पोस्टमॉर्टेम अहवालात राजकीय दबावतंत्र वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांच्या वतीने करण्यात येतोय. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी कऱण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तर रुपकुमार शाह यांना विशेष सुरक्षाही देण्यात आली आहे.
- 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतच्या निधनाचे वृत्त समोर आली होते. – पोलिसांना संशयास्पद स्थितीत त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.
- सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला, तसेच यामागे त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा हात असल्याचंही म्हटलं जात होतं.
- अनेक अंगांनी तपास करण्यात आला. अखेरीस सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या असल्याचे अहवालात म्हटले गेले.
- मात्र रुपकुमार शाह यांनी पोस्टमॉर्टेम रिपोर्टवेळी गडबड झाल्याचा दावा केल्यानंतर या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे.