उद्धव ठाकरे म्हणाले, औरंगजेब मेरा भाई था; यावरून ट्रोल झालं कोण..?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असल्याची टीका नितेश राणे यांनी त्यांच्यावर करताना सर्वात मोठा गद्दार म्हणत त्यांनी औरंगजेबबाबत बोलतानाचा व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे.
मुंबईः औरंगजेब मेरा भाई था असं वक्तव्य असलेला एक व्हिडीओ भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट केला आहे. त्यावरून आता राजकीय आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उद्धव ठाकरे यांनी एका भारतीय जवानाच्या हौतात्म्याची गोष्ट सांगताना औरंगजेब नावाच्या जवानाचे कतृत्व सांगितले होते. त्या व्हिडीओमधील काही भाग वगळून औरंगजेब मेरा भाई था एवढच व्हिडीओ नितेश राणे यांच्याकडून ट्विट करण्यात आला. त्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक होत नितेश राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याची लायकी नसल्याचे म्हणत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडून ठाकरे कुटुंबीयांवर वारंवार जोरदार टीका केली जाते. तशीच टीका त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला.
मात्र हिंदुत्वाच्या मुद्यावरून जो व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे, त्या व्हिडीओमुळे मात्र नितेश राणे यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. त्यावरून ठाकरे गटानेही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असल्याची टीका नितेश राणे यांनी त्यांच्यावर करताना सर्वात मोठा गद्दार म्हणत त्यांनी औरंगजेबबाबत बोलतानाचा व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे.
सर्वात मोठा गद्दार !!! pic.twitter.com/2ZlgvRaeRN
— nitesh rane (@NiteshNRane) February 28, 2023
औरंगजेब मेरा भाई था या वाक्यावरून आता निलेश राणे यांनी हिंदुत्वावरून ठाकरे यांना छेडले आहे. उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैन्य दलातील जवान औरंगजेब ज्यावेळी शहीद झाला आणि त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेत औरंगजेब सैनिकाचा मृतदेह सापडला तेव्हा आमचा भाऊ असल्याचे सांगत त्याचे नाव औरंगजेब असल्याचेही ते सांगतात.
त्यावरून तो मुस्लिम असला तरी तो भारतमातेसाठी शहीद झाल्याचेही ते सांगतात. मात्र निलेश राणे यांनी अर्धवट व्हिडीओ ट्विट केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आले आहे.