Nitesh Rane: नितेश राणेंना तूर्तास अटक नाही, शुक्रवारी अटकपूर्व जामिनावर होणार सुनावणी
संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रं सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे.
मुंबई: संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रं सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. तसेच तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही कोर्टाला दिली आहे. त्यामुळे नितेश यांना तूर्तास अटक होणार नसून आता त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळून लावल्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज त्यावर कोर्टात सुनावणी झाली. यावेळी नितेश राणे यांचे वकील नितीन प्रधान यांनी त्यांची बाजू मांडली. तर सरकारी वकिलांनीही नितेश राणे हेच संतोष परब हल्ला प्रकरणातील सूत्रधार असल्याचं कोर्टाला सांगितलं. नितेश राणे हेच हल्लाप्रकरणातील सूत्रधार असल्याने त्यांना कोणत्याही परिस्थितीत अटकपूर्व जामीन मंजूर करू नये. तसे कोर्टाच्या रेकॉर्डवर या गुन्ह्याशी संबंधित अनेक गोष्टी येण्याची गरज आहे. त्यामुळे या संपूर्ण बाबी प्रतिज्ञापत्राच्या स्वरुपात मांडण्यासाठी सरकारी वकिलांकडून कोर्टाकडे वेळ मागवून घेण्यात आली. त्याचवेळी प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल होईपर्यंत नितेश राणे यांना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाहीही राज्य सरकारने कोर्टाला दिली.
शुक्रवारी पुढील सुनावणी
त्यानंतर कोर्टाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्रं सादर करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर शुक्रवार दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी दोन्ही बाजूचे वकील काय युक्तीवाद करतात आणि नितेश राणेंना जामीन मिळतो का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण?
18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/7JwexyS5J0#BreakingNews | #LiveUpdates | #Corona | #Omicron |
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 4, 2022
संबंधित बातम्या:
Nashik| नाशिकमध्ये घरपट्टी माफ होणे तूर्तास अशक्य, घोडे कुठे आडले?