नितीन देसाई प्रकरणात सर्वात मोठी बातमी, ‘या’ व्यक्तींवर गुन्हा दाखल

नितीन देसाई प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रायगड पोलिसांनी याप्रकरणी काही व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे नितीन देसाई यांच्या कुटुंबियांनी एडलवाईज कंपनीवर गंभीर आरोप केल्याची माहिती मिळत आहे.

नितीन देसाई प्रकरणात सर्वात मोठी बातमी, 'या' व्यक्तींवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 10:26 PM

मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपल्या एनडी स्टुडिओत स्वत:ला संपवलं. या प्रकरणी आता पोलिसांकडून कसून तपास सुरु झाला आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झालाय. या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्या आरोपींची नावं समोर आली आहेत. याप्रकरणी रायगड पोलीस लवकरच सर्वांना समन्स देवून चौकशीला बोलवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खालापूर पोलिसांनी नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एडलवाईज कंपमीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना या प्रकरणात आरोपी बनवण्यात आलं आहे. यामध्ये एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांचा समावेश आहे. तसेच स्मित शाह, आर के बन्सल, जितेंद्र कोठारी, केऊर मेहता यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय.

नितीन देसाई आणि एडलाईज कंपनी यांच्यातील कर्जाच्या मुद्द्यावर एनसीएलटी कोर्टाने जी ऑर्डर दिली होती, त्यावेळी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. जितेंद्र कोठारी असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली दोन्ही बाजूने चर्चा होऊन एक ठरावीक रक्कम ठरवण्याबाबत एनसीएलटी कोर्टाने निर्देश दिले होते. या प्रकरणात जितेंद्र कोठारी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोठारी आणि इतर अधिकाऱ्यांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नितीन देसाई वन टाईम सेटलमेंटसाठी तयार होते?

सूत्रांकडून आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नितीन देसाई हे वन टाईम सेटलमेंटसाठी तयार होते. नितीन देसाई यांची एडलवाईज कंपनीसोबत भेट झाली. पण सेटलमेंटसाठी कंपनीने होकार किंवा नकार कळवला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एडलवाईजने कर्जाच्या रकमेवर व्याज वाढवण्याची वाट पाहिली, अशीदेखील धक्कादायक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. एडलवाईज कंपनी एनसीएलटी कोर्टात गेली आणि कोर्टाचा आदेश नितीन देसाई यांच्याविरोधात आला.

नितीन देसाई यांनी स्वत:ला संपवण्यापूर्वी ते अनेकदा एडलवाईज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलत होते. देसाई वन टाईम सेटलमेंटसाठी तयार असताना देखील त्यांना होकार किंवा नकार कळवण्यात आला नव्हता. फक्त वेळ मारुन नेसल्याचं काम कंपनीने केलं. स्टुडिओ कब्जात घेण्यासाठीच कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न होत होते. त्यामुळे 180 कोटींचं मूळ कर्जाचं व्याज 252 कोटी पर्यंत होण्यापर्यंत एडलवाईज कंपनीने वाट पाहिली, असा आरोप देसाई यांच्या कुटुंबियांचा आहे.

ही रक्कम मोठी झाल्यानंतर अचानक कोर्टात जावून देसाई यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. यातून कंपनीचा स्टुडिओ हडप करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप देसाई यांच्या कुटुंबियांचा आहे. म्हणून एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा आणि इतर अधिकारी हे नितीन देसाई यांच्याशी वारंवार बोलत होते. पण वन टाईम सेटलमेंटचा कोणताही निर्णय त्यांनी घेतला नाही. त्या सगळ्यांवर आता गुन्हा दाखल करुन कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे. पोलीस या सगळ्यांना समन्स पाठवून चौकशीला बोलवून तपास करणार आहेत.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.