उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार?, नितीन गडकरी यांनी केला मोठा दावा

| Updated on: Jul 09, 2023 | 9:25 PM

एका कार्यक्रमात गडकरी यांनी हा दावा केलाय. गडकरी यांचा हा दावा उद्धव ठाकरे यांनी मात्र फेटाळून लावलाय.

उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार?, नितीन गडकरी यांनी केला मोठा दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई :  राज्यात कोण कोणासोबत येईल. काही सांगता येत नाही. सध्या राजकारण वेगळ्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरु आहे. भाजप नेते नितीन गडकरी यांनी एक मोठा दावा केलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करा, असं बाळासाहेबांनी आपल्याला सांगितल्याचं गडकरी यांनी म्हटलंय.

एका कार्यक्रमात गडकरी यांनी हा दावा केलाय. गडकरी यांचा हा दावा उद्धव ठाकरे यांनी मात्र फेटाळून लावलाय. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेही खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी राज ठाकरेही बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंबाबद्दल भरभरुन बोलले होते.

राज ठाकरे यांचे कौतुक

उद्धव ठाकरे आणि आपल्यातल्या नात्यात कुणीतरी विष कालवलं असं राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा आपण राज आणि उद्धव या दोघांनाही समजावलं होतं, असा दावाही गडकरी यांनी केलाय. राज ठाकरे यांच त्यांनी विशेष कौतुक केलंय.

 

सभेत झळकले पोस्टर

सध्या राज्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. काही कार्यकर्त्यांनी तशी मागणी केलीय. उद्धव ठाकरे यांच्या सभेत तसे पोस्टरही झळकले आहेत. त्यामुळं बाळासाहेबांची गडकरींजवळ बोलून दाखवलेली इच्छा आता तरी पूर्ण होणार का हेच पाहावं लागेल.

कार्यकर्ता फलकं घेऊन आला

दिग्रस येथील कार्यक्रमात एक कार्यकर्ता फलक घेऊन आला. त्याने ठाकरे बंधू यांनी एकत्र यावं, असा फलक हाती घेतला होता. तो फलकं उद्धव ठाकरे यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्त्यांची मागणी ठाकरे बंधू कितपत गांभीर्याने घेतात, हे येणारी वेळच सांगेल.