आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही, कट कारस्थानही रचलं नाही: हायकोर्ट
क्रुझ पार्टी प्रकरणात आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही. त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कट कारस्थान करण्याचा हेतू असल्याचं आढळून आलेलं नाही.
मुंबई: क्रुझ पार्टी प्रकरणात आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही. त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कट कारस्थान करण्याचा हेतू असल्याचं आढळून आलेलं नाही, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. उच्च न्यायालयाच्या ऑर्डर कॉपीमध्ये ही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला 30 ऑक्टोबर रोजी जामीन देण्यात आला होता. आर्यनच्या जामीन ऑर्डरमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. त्यानुसार आर्यनच्या चॅटमध्ये कट कारस्थान असल्याचं आढलून येत नाही. आर्यन आणि अरबाज मर्चंट हे दोघेही स्वतंत्रपणे प्रवास करत होते. तसेच आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नाही. इतर आरोपींकडे ड्रग्ज सापडलं. पण त्याची मात्रा कमी होती, असं या ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
आर्यनचा गुन्हा करण्याचा हेतू नव्हता
आर्यनचा गुन्हा करण्याचा हेतू होता, असा कोणताही पुरावा नसल्याचं निरीक्षण यात नोंदवलं आहे. त्याशिवाय या प्रकरणात एनसीबीने एनडीपीएसचं 29 कलम लावलं होतं. कट रचल्याबाबतचं हे कलम होतं. ते योग्यरित्या लावलं का हे आम्हाला तपासावं लागेल. तसेच या बाबतचे पुरावे आहेत का हे सुद्धा आम्हाला तपासावं लागेल, असं कोर्टाने नमूद केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
आर्यनला 28 ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला होता. त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी तो बाहेर आला होता. तब्बल 25 दिवसानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी शर्तीवर त्याला जामीन देण्यात आला होता. मुंबईत क्रुझवर पार्टी सुरू असताना त्यावर एनसीबीने धाड मारली होती. या धाडीत ड्रग्ज सापडलं होतं. या प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात आर्यन खानचाही समावेश होता.
कोण आहे आर्यन खान?
आर्यन खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि इंटिरिअर डिझायनर-चित्रपट निर्माती गौरी खान यांचा सर्वात मोठा मुलगा. तो 23 वर्षांचा आहे. त्याने लहानपणीच काही बॉलिवूडपटांसाठी डबिंग करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये द लायन किंग, द इन्क्रेडिब्ल्स (हम है लाजवाब) यासारख्या सिनेमांचा समावेश आहे. 2004 मध्ये त्याला हम है लाजवाब या अॅनिमेशनपटासाठी सर्वोत्कृष्ट डबिंग चाईल्ड आर्टिस्टचा पुरस्कारही मिळाला होता.
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 20 November 2021#VIDEO #महाफास्ट_न्यूज #MahaFastNews pic.twitter.com/6rRJXzmri3
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2021
संबंधित बातम्या:
Bhavana Gawali : खासदार भावना गवळी यांना ईडीचं तिसरं समन्स, चौकशीला सामोरं जाणार का?
विधान परिषद निवडणुकीत चुरस की विजय सोपा?; कसं आहे मुंबईतील गणित