आता मास्क न लावता खुशाल गाडी चालवा, खासगी वाहनांसाठी पालिकेची नियमावली जारी
मुंबई महानगरपालिकेने खासगी आणि सार्वजनिक वाहनधारकांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. (BMC Issue New Guidelines For Private Vehicle)
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मुंबई महानगरपालिकेने वाहनधारकांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार खासगी वाहनधारकांना मास्क न लावताही गाडी चालवता येणार आहे. कारण खासगी वाहनांमध्ये मास्क न घालणाऱ्यांना पालिकेकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही. मात्र सार्वजनिक वाहनांमध्ये मास्क घालणे गरजेचे आहे, असे पालिकेने नव्या नियमावलीत म्हटलं आहे. (BMC Issue New Guidelines For Private Vehicle)
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूदर हे दोन्हीही सध्या आटोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने खासगी आणि सार्वजनिक वाहनचालकांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार खासगी वाहनांमध्ये मास्क न घालणाऱ्या लोकांकडून दंड आकारला जाणार नाही. मात्र सार्वजनिक वाहतुकीत मास्क न घालणे हा दंडनीय अपराध आहे.
मुंबई महापालिकेने 8 एप्रिलपासून मास्क घालणे अनिर्वाय केले आहे. मास्क न घालणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात होती. तसेच जर कोणी दंड भरण्यास नकार देत असेल, तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. मास्क न घालणाऱ्यांसाठी दंड म्हणून 1 हजार रुपये रक्कम वसूल केली जात होती. ही रक्कम सप्टेंबरमध्ये कमी करत 200 रुपये केली होती.
राज्यातील कोरोना अपडेट
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 19 लाख 87 हजार 678 इतकी झाली आहे. नुकतंच मुंबईत 2 हजार 910 नवे रुग्णांची नोंद केली होती. तर 50 हजार 388 जणांचा मृत्यू झाला होता. काल 3 हजार 039 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 18 लाख 84 हजार 127 इतकी आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 51 हजार 965 इतकी आहे. (BMC Issue New Guidelines For Private Vehicle)
संबंधित बातम्या :
आरोग्य विभागात 8 हजार 500 पदांची भरती, आरोग्य मंत्री राजेश टोपेंची घोषणा
कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणाला स्थगिती, गैरसमज पसरवू नका, किशोरी पेडणेकरांचे आवाहन