राज ठाकरेंना उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर बोलावणाऱ्या विनय दुबेंना अटक
मुंबई : उत्तर भारतीय महापंचायतीचे अध्यक्ष विनय दुबे यांना अटक करण्यात आली आहे. विनय दुबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवणार होते. त्याअगोदरच पोलिसांनी विनय दुबे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. विनय दुबे यांच्यासोबतच कार्यकर्ते योगेंद्र तिवारी यांनाही कल्याण पोलिसांनी दादरहून अटक केली. रविवारी या दोघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. “श्री नरेंद्र […]
मुंबई : उत्तर भारतीय महापंचायतीचे अध्यक्ष विनय दुबे यांना अटक करण्यात आली आहे. विनय दुबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवणार होते. त्याअगोदरच पोलिसांनी विनय दुबे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. विनय दुबे यांच्यासोबतच कार्यकर्ते योगेंद्र तिवारी यांनाही कल्याण पोलिसांनी दादरहून अटक केली. रविवारी या दोघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.
“श्री नरेंद्र मोदी ना काळे झेंडे दाखवणार म्हणून उत्तर भारतीय महापंचायतच्या विनय दुबे ना पोलिसानी पहाटे चार वाजता अटक केली ही कुठली हुकूम शाही? असा सवाल मनसे नेते संदिप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
श्री नरेंद्र मोदी ना काळे झेंडे दाखवणार म्हणून उत्तर भारतीय महापंचायत च्या विनय दुबे ना पोलिसानी पहाटे चार वाजता अटक केली ही कुठली हुकूम शाही ?????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 16, 2018
उत्तर भारतीयांना अजूनही त्यांच्या हक्कासाठी वणवण भटकावं लागतं आणि देशभरात अपमान सहन करावा लागतो. पंतप्रधान मोदी हे वाराणसी मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांना काळे झेंडे दाखवून मागण्यांकडे लक्ष वेधणार असल्याची फेसबुक पोस्ट विनय दुबे यांनी केली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2 डिसेंबरला उत्तर भारतीयंना हिंदी भाषेतून संबोधित केलं होतं. उत्तर भारतीय महापंचायतीच्या या कार्यक्रमाचं आयोजन विनय दुबे यांनी केलं होतं, शिवाय राज ठाकरेंना कार्यक्रमाचं निमंत्रणही त्यांनीच दिलं होतं.
विनय दुबे राज ठाकरेंच्या कार्यक्रमाअगोदरही एकदा चर्चेत आले होते. एका व्हिडीओद्वारे त्यांनी उत्तर भारतीय नेत्यांना सुनावलं होतं. शिवाय राज ठाकरेंबद्दल गैरसमज पसरवण्यात आमचेच नेते कारणीभूत आहेत, असं म्हटलं होतं. यासोबतच त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावरही निशाणा साधला होता.
“अनेक उत्तर भारतीय हे ग्राऊंड लेव्हलचे आहेत. मनसेची बाजू त्यांच्यापर्यंत नीट पोहोचत नाही. त्यामुळे राज ठाकरे आमच्या मंचावर आल्याने अनेक उत्तर भारतीयांना त्यांची उत्तरं मिळतील. अनेक गोष्टी ग्राऊंडच्या उत्तर भारतीयांपर्यंत गाळून येते, त्यामुळे अनेक गैरसमाज निर्माण होतात. हे गैरसमज पसरवण्यासाठी आमचे अनेक नेतेही कारणीभूत आहेत. राज ठाकरे यांच्याशी सरळ संवाद साधल्याने उत्तर भारतीयांच्या मनातील अनेक शंका दूर होतील.”, असा विश्वास विनय दुबे यांनी व्यक्त केला होता.