आता ‘शताब्दी’मधून पुस्तकं वाचत प्रवास करा

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी आता आणखी एक खुशखबर आहे. रेल्वे प्रवास तुम्हाला आणखी सुखकर करायचा असल्यास आता त्यासोबत पुस्तकही वाचता येणार आहेत. यासाठी पश्चिम रेल्वेतर्फे मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशासांठी आता वाचनालयाची सुविधा मिळणार आहे. या वाचनालयात प्रवाशांना त्यांच्या आवडीची पुस्तक वाचायला मिळणार आहेत. लहानमुलांपासून ते मोठ्यापर्यंत पुस्तकं उपलब्ध या वाचनालयात सध्या 70 […]

आता 'शताब्दी'मधून पुस्तकं वाचत प्रवास करा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी आता आणखी एक खुशखबर आहे. रेल्वे प्रवास तुम्हाला आणखी सुखकर करायचा असल्यास आता त्यासोबत पुस्तकही वाचता येणार आहेत. यासाठी पश्चिम रेल्वेतर्फे मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशासांठी आता वाचनालयाची सुविधा मिळणार आहे. या वाचनालयात प्रवाशांना त्यांच्या आवडीची पुस्तक वाचायला मिळणार आहेत.

लहानमुलांपासून ते मोठ्यापर्यंत पुस्तकं उपलब्ध

या वाचनालयात सध्या 70 पुस्तकं आहेत. जे इतिहास, राजकारण, आत्मचरित्र, कादंबरी, रहस्यमय कथा इत्यादी विषयांवर पुस्तकं उपलब्ध आहेत. ट्रेनमध्ये लहान मुलांसाठी अंदाजे 35 पुस्तकं उपलब्ध आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशी मोफत ही पुस्तकं वाचू शकतो. या सुविधांसाठी प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. प्रवासानंतर प्रवासांना ही पुस्तकं पुन्हा परत करणे अनिवार्य राहील.

शताब्दी एक्स्प्रेस होणार आता आधुनिक

रेल्वेच्या या प्रयोगाला प्रवाशांनीही पसंती दर्शवली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत या प्रवासाला पसंती देत आहेत. विशेष म्हणजे रेल्वेकडून शताब्दी ट्रेन आणि प्रवाशांसाठी आधुनिक सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या ट्रेनमध्ये अनाऊन्समेंट स्क्रीन आणि एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे.

आकर्षक कोच

भारतीय रेल्वेतर्फे शानदार असे कोच तयार करण्यात आले आहेत. त्यांना अनुभूती कोच नाव दिले आहे. त्यांना रेल्वेच्या चेन्नई कारखान्यात तयार करण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वेला काही अनुभूती कोच दिल्या आहेत. या ट्रेनच्या डब्ब्यात अप्रतीम अशा कोच बसवण्यात आल्या आहेत. ज्या गरजेप्रमाणे आपण अॅडजस्ट करु शकता. तसेच कोचच्या मागे एलईडी स्क्रीन आणि चार्जर पॉईंट दिला आहे.

अनुभूती कोचमध्ये स्नॅक्स टेबलची सुविधा देण्यात आली आहे. तसेच ग्राहक घोषणाही दिली आहे. डब्ब्यामध्ये विमानासारखे मॉड्यूलर टॉयलेट दिले आहे. या ट्रेनचा डब्बा बनवण्यासाठी अंदाजे 2.84 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.