आता एअरपोर्टवर तपासणीदरम्यान मोबाईल, लॅपटॉप ट्रेमध्ये ठेवायची गरज नाही

काही देशांमध्ये विमानतळांवर सुरक्षा तपासणी करताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाजूला काढून ठेवण्याची काही गरज लागत नाही. अमेरीका आणि युराेपातील अनेक विमानतळांवर प्रवाशांची सुरक्षा तपासणी वेगाने होते. कारण तेथे अत्याधुनिक स्कॅनर बसविले आहेत.

आता एअरपोर्टवर तपासणीदरम्यान मोबाईल, लॅपटॉप ट्रेमध्ये ठेवायची गरज नाही
AIRPORT-SECURITYImage Credit source: AIRPORT-SECURITY
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 7:34 PM

मुंबई : विमानतळावर प्रवाशांना सुरक्षा तपासणी करण्यापूर्वी प्लास्टीक ट्रेमध्ये मोबाईल, लॅपटॉप आणि चार्जर काढून ठेवायला सांगितले जाते. परंतू लवकरच अशाप्रकारे ट्रेमध्ये आपल्या जवळील इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवण्याची काहीही गरज लागणार नाही. त्यामुळे विमानतळावरील रांगा कमी होण्यास मदतच मिळणार आहे.

विमानतळावरील सुरक्षा तपासणीसाठी भरपूर वेळ लागत असल्याने प्रवाशांना खूपच आधी विमानतळावर हजर व्हावे लागत असते. मात्र एव्हीएशन सिक्युरिटी वॉचडॉग आणि ब्यूरो ऑफ सिव्हील एव्हीएशन सिक्युरिटी (BCAS) महिनाभरात यावर निर्णय घेणार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांजवळील इलेक्ट्रोनिक उपकरणांना बाजूला न ठेवता प्रवाशांची झडती घेणे शक्य होणार आहे.

अमेरिका तसेच यूरोपातील अनेक विमानतळांवर प्रवाशांना त्यांच्याजवळील मोबाईल, लॅपटॉप आणि चार्जर आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे ट्रेमध्ये बाजूला काढून ठेवण्यास सांगितले जात नाही. तसेच तेथे जॅकेट न काढताच सुरक्षा तपासणी करण्याची सोय आहे. कारण या विमानतळांवर नवे अत्याधुनिक बॅगेज स्कॅनर बसविले आहेत. आम्ही प्रवाशांना वेगाने त्यांची सुरक्षा तपासणी कशी होईल यासाठी प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्रालयाने म्हटले आहे.

या नवीन बॅगेज स्कॅनर मशिन सुरूवातीला दिल्ली, मुंबई, बेंगलुरु और हैदराबाद सारख्या प्रमुख विमानतळांवर लावण्यात येतील. त्यानंतर वर्षभरात इतर विमानतळांवर या मशिन बसविण्यात येतील असे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून विमानप्रवाशांची संख्या वाढल्याने वाढती गर्दी पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळांवर चेक इन आणि सिक्युरिटी चेक करताना तासनतास लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.