Ambedkar Jayanti 2023 : “हे नाणं दिसतया शोभून बाबासाहेबांच्या फोटूनं”: चित्रकाराकडून बाबासाहेबांना अनोखं अभिवादन…

भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ 1 रुपयांचे नाणे काढले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रकार कौशिक जाधव यांनी एक रुपयाच्या नाण्यावर बाबासाहेबांचे चित्र कलाकृतीतून रेखाटले आहे. त्यांच्या या कलाकृतीचे अनेकांकडून कौतूक झाले आहे.

Ambedkar Jayanti 2023 : हे नाणं दिसतया शोभून बाबासाहेबांच्या फोटूनं: चित्रकाराकडून बाबासाहेबांना अनोखं अभिवादन...
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 10:02 PM

विरार : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर यांची 14 एप्रिल रोजी होणारी जयंती भारतात वेगवेगळ्या उपक्रमातून साजरी होत असते. समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तिंकडून बाबासाहेब आंबेडकर यांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून अभिवादन केले जाते. साहित्यिक, विचारवंत, कवी, नाटककार आणि चित्रकारांकडून नेहमीच 14 एप्रिलच्या निमित्ताने वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. तर यावेळीही एका चित्रकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्र रेखाटत बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. चित्रकार कौशिक जाधव यांनी 1 रुपयाच्या नाण्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र साकारले आहे. त्यांचे हे चित्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

द प्रॉब्लम् ऑफ द रूपी : इट्स ओरिजिन ॲन्ड इट्स सोल्युशन (मराठी: रुपयाची समस्या) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शोध प्रबंध आहे.

तो शोधप्रबंध त्यांनी ऑक्टोबर 1922 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर आफ सायन्स (डीएससी) च्या पदवीसाठी प्रस्तुत केला होता.

BR Ambedkar

चित्रकार कौशिक जाधव यांना एक रुपयाच्या नाण्यावर साकारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

त्यांच्या जयंती निमित्त आणि त्यांच्या संशोधकनाला पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी चित्रकार कौशिक जाधव यांनी एक रुपयावर बाबासाहेबांची कलाकृती साकारून त्यांना अभिवादन केले आहे. इ.स.1990 मध्ये भारत सरकारने बाबासाहेब आंबेडकर यांची 100 वी जयंती साजरी केली होती.

त्यावेळी त्यांच्या स्मरणार्थ 1 रुपयांचे नाणे काढले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रकार कौशिक जाधव यांनी एक रुपयाच्या नाण्यावर बाबासाहेबांचे चित्र कलाकृतीतून रेखाटले आहे. त्यांच्या या कलाकृतीचे अनेकांकडून कौतूक झाले आहे.

कौशिक जाधव यांना एक रुपयाच्या नाण्यावर हे चित्र रेखाटण्याकरिता त्यांनी वॉटर कलर्सचा वापर करून अवघ्या 30 मिनिटांच्या कालावधीत बारकाईनेहे चित्र तयार केले.

चित्रकार कौशिक जाधव हा विरार भाताने येथील रहिवासी असून, वसईतील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत ते कला शिक्षक या पदावर कार्य करतात.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.