ओला-उबर चालक पुन्हा संपावर

मुंबई : ओला आणि उबर चालक मालक आजपासून पुन्हा एकदा संपावर गेले आहेत. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने ओला व उबर या खासगी टॅक्सीसेवा पुरवठादार कंपन्यांच्या चालकांनी आजपासून पुन्हा एकदा संपाचा पवित्रा घेतला. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सुमारे 30 हजार ओला-उबर चालक मालक शनिवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले. याआधीही मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील 30 […]

ओला-उबर चालक पुन्हा संपावर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : ओला आणि उबर चालक मालक आजपासून पुन्हा एकदा संपावर गेले आहेत. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने ओला व उबर या खासगी टॅक्सीसेवा पुरवठादार कंपन्यांच्या चालकांनी आजपासून पुन्हा एकदा संपाचा पवित्रा घेतला. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सुमारे 30 हजार ओला-उबर चालक मालक शनिवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले. याआधीही मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील 30 हजार ओला-उबर चालकांनी 12 दिवस संप पुकारला होता. त्यावेळी सरकार समोर 13 मागण्या मांडण्यात आल्या होत्या.

संप मिटण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी टॅक्सी कंपन्या, चालक-मालक संघटनांची बैठक बोलावून 15 नोव्हेंबरपर्यंत ओला-उबर टॅक्सी चालकांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. पण 17 नोव्हेंबर आला तरी सरकारने कुठलाही मार्ग काढला नाही. त्यानंतर शनिवारी 17 नोव्हेंबरला पुन्हा एक बैठक घेण्यात आली, पण या बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने ओला-उबर चालक शनिवारी मध्यरात्रीपासून पुन्हा संपावर गेले. शिवाय सोमवारी सकाळी 10 वाजता लालबाग भारतमाता सिनेमाजवळून सरकार विरोधात आक्रोश मोर्चाही काढण्यात येईल.

ओला-उबर खाजगी टॅक्सी चालक मालकांच्या मागण्या काय?

-एसी हॅचबॅक कॅबसाठी प्रतिकिमी 16 रुपये दर ठेवावा.

-एसी सेदा न कॅबसाठी प्रतिकिमी 18 रुपये दर ठेवावा.

-एसयूव्ही कारसाठी पहिल्या चार किलोमीटरसाठी किमान 100 ते 150 रुपये भाडेदर निश्चित ठेवावा.

मागीलवेळी जेव्हा ओला-उबर चालकांनी 12 दिवसांचा संप पुकारला होता, तेव्हा सामान्य नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला होता. दरम्यान इतर टॅक्सी चालकांनीही संधीचा फायदा घेत प्रवाशांना लुटले. वाट्टेल त्या दारात या टॅक्सीचालकांनी प्रवाशांकडून पैसे उकळले. आता ओला-उबर चालक पुन्हा एकदा संपावर गेल्याने कदाचित सामान्य नागरिकांना पुन्हा या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.