धक्कादायक! तंबाखू सेवनामुळे दर 6 सेकंदाला एकाचा मृत्यू, दरवर्षी जगात तंबाखूसेवनाचे 80 लाख बळी

तंबाखूसेवनाचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात आणि जगभरात हे मृत्यूचे एक ठळक कारणही आहे. तंबाखूमुळे दर 6 सेकंदात एक व्यक्ती दगावते म्हणजे दर 10 प्रौढांच्या मृत्यूतील एक मृत्यू या कारणामुळे होतो.

धक्कादायक! तंबाखू सेवनामुळे दर 6 सेकंदाला एकाचा मृत्यू, दरवर्षी जगात तंबाखूसेवनाचे 80 लाख बळी
कुलाब्यातील एचसीजी कॅन्सर सेंटरतर्फे तंबाखूसेवनाच्या दुष्परिणामांबद्दल जागरुकतेसाठी चर्चेचे आयोजन
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 5:50 PM

मुंबई: जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कुलाब्यातील एचसीजी कॅन्सर सेंटरतर्फे (HCG Cancer Center) तंबाखूसेवनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि हे धोके कमी करण्यासाठी काय करावे यासंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. एचसीजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनुरेष जैन यांच्या उपस्थितीत सर्जिकल आँकॉलॉजिस्ट डॉ. अंकित माहुवकर, हेड अॅण्ड नेक सर्जिकल आँकॉलॉजिस्ट डॉ. प्रशांत पवार आणि सर्जिकल आँकॉलॉजिस्ट डॉ. निनाद काटदरे यांचा या चर्चेत सहभाग होता. या चर्चासत्राला सामान्य नागरिक, कॅन्सरवर मात करून बरे झालेले रुग्ण आणि रुग्णांच्या कुटुंबियांनीही हजेरी लावली होती.

जागतिक आरोग्य परिषदेच्या (WHO) 2022 च्या अहवालानुसार, तंबाखूसेवनामुळे दरवर्षी 80 लाखांहून अधिक जण मृत्यूमुखी पडतात. यातील 70 लाखाहून अधिक मृत्यू हे थेट तंबाखूसेवनाच्या (Tobacco) सवयीमुळे होतात तर साधारण 1.2 दशलक्ष मृत्यू हे सेकंड हँड स्मोक म्हणजे धूम्रपान न करणारे मात्र धूम्रपानाच्या सानिध्यात असणाऱ्यांचे असतात.

मृत्यूचे एक ठळक कारण

तंबाखूसेवनाचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात आणि जगभरात हे मृत्यूचे एक ठळक कारणही आहे. तंबाखूमुळे दर 6 सेकंदात एक व्यक्ती दगावते म्हणजे दर 10 प्रौढांच्या मृत्यूतील एक मृत्यू या कारणामुळे होतो. सामान्यपणे आढळणाऱ्या फुफ्फुसांचा आणि तोंडाचा कर्करोग यासारख्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या धोकादायक आहे. त्यामुळे तंबाखू सेवनाच्या सवयीकडे लक्ष दिले पाहिजे तसेच हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय केले जायला हवेत.

श्वसनाचे गंभीर आजार

तंबाखूसेवनाबद्दलची वाढती चिंता अधोरेखित करताना एचसीजी कॅन्सर सेंटर कुलाब्याचे हेड अॅण्ड नेक सर्जिकल आँकॉलॉजिस्ट डॉ. प्रशांत पवार म्हणाले,  “तंबाखूचे व्यक्तीच्या आरोग्यावर विविध प्रकारचे परिणाम होत असतात. यात कर्करोग, श्वसनाचे गंभीर आजार आणि टीबी यासारखे आजार होतात.

कर्करोग होण्याचा धोका अधिक

धूम्रपान करणाऱ्यांना इतरांच्या तुलनेत कर्करोग होण्याचा धोका फार अधिक असतो. तंबाखू खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग आणि प्रीकॅन्सर स्थिती निर्माण होते. तंबाखूसेवनात भारत जगभरात दुसऱ्या क्रमांकावर तर उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तंबाखूसेवन म्हणजे फक्त धूम्रपान नव्हे तर तंबाखू खाणेसुद्धा. तुमचे आरोग्य आणि तुमच्या कुटुंबियांच्या हिताचा विचार करून तंबाखूसेवन बंद करणेच योग्य.”

तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल सजग

एचसीजी कॅन्सर सेंटर कुलाब्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनुरेश जैन म्हणाले,  “एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आम्ही सातत्याने लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यादृष्टीने टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे. यातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल सजग करू शकू. तंबाखूसेवनामुळे तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होता आणि त्यातून कर्करोगासारखे आजार होतातच. पण, त्याचसोबत त्यातून पर्यावरणालाही धोका निर्माण होतो. तंबाखूमुळे अनेक प्रकारचे कर्करोग होतात आणि त्यातून या रुग्णांना कमी वयात, वेदनादायी मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामुळेच, तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी आणि प्रत्येकाने आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्यावी यासाठी जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे.”

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.