बाळासाहेब थोरातांच्या बंगल्याच्या दालनात आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या प्रसंगावधानमुळे अनर्थ टळला

| Updated on: Mar 11, 2021 | 7:21 AM

बंगल्याच्या विशेष कार्यकरी अधिकारी दालनात एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. (One Person Suicide Balasaheb Thorat bungalow)

बाळासाहेब थोरातांच्या बंगल्याच्या दालनात आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या प्रसंगावधानमुळे अनर्थ टळला
महाराष्ट्र पोलीस
Follow us on

मुंबई : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्याच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा एका व्यक्तीने प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. (One Person try to commit Suicide in Balasaheb Thorat bungalow)

पोलिसांच्या प्रसंगावधेतमुळे अनर्थ टळला

मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात यांचा पेडर रोडवरील ‘रॉयल स्टोन’ हा आलिशान बंगला आहे. या बंगल्याच्या विशेष कार्यकरी अधिकारी दालनात एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. पांडुरंग वाघ असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पांडुरंग वाघ यांनी अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी पोलिसांनी अडवल्याने मोठा अनर्थ टळला.

या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी पांडुरंग वाघ यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच त्यांना अटक करुन जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

कोण आहेत पांडुरंग वाघ?

पांडुरंग वाघ हे अहमदनगरच्या नेवासा येथील झापडी गावचे रहिवाशी आहेत. वाघ यांनी शासनाकडून 2018 मध्ये वाळू उत्खनन आणि वाहतूकीचा शासकीय परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यांनी शासनाकडे 8 लाख 72 हजार भरले होते. माञ स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही. यामुळे शासनाला भरलेले पैसे परत मिळावे यासाठी वाघ हे मुंबईत आले होते.

माञ वाघ यांनी सनदशीर मार्गाचा अवलंब न करता शासनाला वेठिस धरण्याच्या हेतूने स्वत:ला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना वेळीच पोलिसांनी अडवत आत्महत्या करण्यापासून रोखले. या प्रकरणी वाघ यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच त्यांना सीआरपीसी 41(1) अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे. (One Person try to commit Suicide in Balasaheb Thorat bungalow)

संबंधित बातम्या : 

सचिन वाझे म्हणजे लादेन नाही, दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवई करणार; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले

‘मराठा समाजाला आरक्षण द्या, अथवा आम्हास विष पिऊन मरु द्या’, खा. उदयनराजेंची फेसबुक पोस्ट, वाचा सविस्तर