Maratha Reservation Hearing in Supreme Court | मराठा आरक्षणावर उद्या सुप्रीम कोर्टात ऑनलाईन सुनावणी
मराठा आरक्षणावर उद्या म्हणजेच 8 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे. | Maratha reservation
मुंबई : मराठा आरक्षणावर (Maratha reservation) उद्या म्हणजेच 8 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ही सुनावणी होणार आहे. गेल्या वेळी 5 फेब्रुवारीला मराठा आरक्षणावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता उद्या या महत्त्वाच्या प्रश्नावर सुप्रीम कोर्यात ही सुनावणी होत आहे. (Online hearing on Maratha reservation in Supreme Court on 8 March)
मराठा आरक्षणप्रकरणी 5 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता उद्या आरक्षणाप्रकरणी सुनावणी होणार आहे. 8 मार्च 10 ते मार्च दरम्यान विरोधक आपली बाजू मांडतील तर 12 ते 17 मार्च दरम्यान राज्य सरकार आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडेल, अशी माहिती आहे.
ऑनलाईन पद्धतीने सुनावणी
कोव्हिड संसर्गामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी पार पडत आहे. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी न घेता प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी, अशी मागणी मराठा संघटना करत आहे. असं असलं तरी उद्याची (8 मार्च) सुनावणी मात्र ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे.
मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची कितपत तयारी?
विरोधक प्रत्येकवेळी मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नाही, असा आरोप करतायत. अशा वेळी मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची कितपत तयारी झाली, हा यानिमित्ताने प्रश्न आहे.
कोण कधी बाजू मांडणार…?
8 ते 10 मार्च विरोधक आपली बाजू मांडतील 12 ते 17मार्च राज्य सरकार युक्तीवाद करेल 18 मार्चला काही नवीन मु्द्दे असतील तर त्यावर सुनावणी होईल तसंच त्याचदिवशी केंद्र सरकारची बाजूही कोर्ट ऐकणार आहे.
मराठा आरक्षणावर कोर्टात सुनावणी, सरकारने एकदिलाने सामोरे जावे, संभाजीराजेंचं आवाहन
मराठा आरक्षणावर येत्या 8 मार्च ते 18 मार्च दरम्यान सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यावेळी तरी सरकारने एकदिलाने सामोरे जावे, असे अवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केले.
(Online hearing on Maratha reservation in Supreme Court on 8 March)
हे ही वाचा :
मागासवर्गीय अहवालाचे संपूर्ण भाषांतर इंग्रजीत का केलं नाही? संभाजी राजे छत्रपती यांचा सरकारला सवाल