मुंबईत स्रियांची कुचंबणा सुरुच, दर 4 पब्लिक टॉयलेटपैकी केवळ 1 महिलांसाठी, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात धक्कादायक माहीती

प्रजा फाऊंडेशनचा 'मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती, 2024' हा अहवाल आज प्रकाशित असून मुंबईतील स्वच्छता आणि वायू प्रदूषण समस्यांचा उहापोह त्यामध्ये केलेला आहे.

मुंबईत स्रियांची कुचंबणा सुरुच, दर 4 पब्लिक टॉयलेटपैकी केवळ 1 महिलांसाठी, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात धक्कादायक माहीती
right to peeImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 9:03 PM

साल 2023 च्या आकडेवारीनुसार मुंबईत दर एक हजार पुरुषांमागे स्रियांचे प्रमाण 853 इतकं आहे. परंतू मुंबईतील सार्वजनिक शौचालयांच्या बाबतीत मुंबईत दर चार पुरुष सार्वजनिक शौचालयांमागे महिलांकरीता केवळ एक शौचालय असे व्यस्त प्रमाण आहे. अशा परिस्थितीत शहराचे नियोजन करणाऱ्यांनी महिला देखील एक माणूसच आहेत याचा विचार करुनच या गोष्टीकडे लक्ष पुरवावे अशी मागणी प्रजा फाऊंडेशनने केली आहे. 2023 च्या आकडेवारीनुसार, मुंबईत दर 4 सार्वजनिक शौचालयातील केवळ 1 शौचालय महिलांसाठी आहे अशी माहीती प्रजा फाऊंडेशनने दिली आहे. एका सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या 752, तर स्त्रियांची संख्या 1820 इतकी जास्त आहे. मात्र, स्वच्छ भारत अभियानानुसार (SBM) एका शौचालयामागे वापरकर्त्यांचे प्रमाण पुरुषांसाठी 100-400 तर स्त्रियांसाठी 100-200 इतके आहे.

पाणी आणि वीज जोडणी नाही

मुंबईत एका सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या 86 आणि स्त्रियांची संख्या 81 आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानानुसार एका शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या 35 आणि स्त्रियांची संख्या 25 असायला पाहिजे. मुंबईत सध्या उपलब्ध असलेली सार्वजनिक शौचालयांची संख्या 82,407 इतकी आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या मापदंडांनुसार इथल्या केवळ एक तृतीयांश झोपडपट्टीवासियांसाठी पुरेशी आहेत. मुंबईतील एकूण सार्वजनिक स्वच्छता गृहांपैकी ( 6,800 ), 69% शौचालयामध्ये पाण्यासाठी नळ जोडणी नाही आणि 60% मध्ये वीजेची सोय नसल्याचे भयाण वास्तव आहे.

2023 मधील सर्वेक्षणानुसार मुंबई शहर ODF गटात आहे, म्हणजे उघड्यावरील शौचास जाणे येथे रोखले आहे. आणि सार्वजनिक शौचालय सुविधांनी स्वच्छतेच्या बाबतील 90% गुण संपादित केले आहेत. पण महाराष्ट्रातील आणि देशातील दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांच्या तुलनेत मुंबईची श्रेणी बरीच खालची आहे.

महाराष्ट्रातील शहरांमध्ये मुंबईचा श्रेणी 37 तर देशातील शहरांमध्ये मुंबईची श्रेणी अधिक घसरून 189 झाली आहे. एक जागतिक महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची ही स्थिती काळजी करण्यासारखी असून त्याची कारणे शोधून उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे मत प्रजा फाऊंडेशनचे ( प्रमुख संशोधन आणि विश्लेषण ) योगेश मिश्रा यांनी व्यक्त केले आहे.

उच्चभ्रू भागात वाईट स्थिती

ज्या प्रभागांमध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक कारणांमुळे ये-जा करणाऱ्या रहिवाशांचे प्रमाण अधिक आहे, तिथली स्थिती तर अधिक बिकट आहे. सी वॉर्ड ( मरीन लाईन्स, चिरा बाजार, गिरगाव ) मध्ये हे प्रमाण फारच व्यस्त असून पुरुषांच्या 6 सार्वजनिक शौचालयांमागे स्त्रियांसाठी केवळ 1 शौचालय उपलब्ध आहे. ही लिंग निहाय तफावत अग्रक्रमाने दूर करणे गरजेचे असून महिलांसाठीदेखील पुरेशी शौचालये संख्या असायला हवी.

 पर्यटकांच्याही आरोग्यास धोका

मुंबई हे बंदराचे शहर असून व्यापारी कारणांप्रमाणेच मुंबईची किनारपट्टी शहराचे हवामान संतुलित राखण्यासाठीही महत्त्वाची आहे’, असे प्रजा फाऊंडेशनचे ( कार्यक्रम समन्वयक ) एकनाथ पवार यांनी म्हटले आहे. परंतू मुंबईच्या तटीय पाण्याची प्रदूषण पातळी चिंताजनकरित्या वाढलेली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) प्रदूषण आटोक्यात राखण्यासाठी मुंबईच्या नदी, समुद्र आणि खाडीतील पाण्याची बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (BOD) आणि . फेकल कोली फॉर्मिन पातळी निर्धारित केली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे आठ प्लांटस् मुंबईत आहेत, तरीदेखीत BOD ची पातळी अपेक्षित 3 मिग्रॅ/लिटर या प्रमाणापेक्षा किमान दोन ते कमाल पाच पटीने अधिक असल्याचे दिसून आले आहे. अशा अतिप्रदूषित पाण्यामुळे तटीय जैवविविधता धोक्यात आली आहे. शिवाय कामासाठी वा करमणुकीसाठी समुद्रकिनारी जाणाऱ्या लोकांच्या आरोग्यालाही धोका पोहोचतो आहे असे ते म्हणाले

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.