एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल; अनिल परब ठाम

आम्ही तुमच्या विरोधात नाही. तुमचे प्रश्न सुटावेत हाच आमचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही कामावर या. राजकारण्यांच्या नादी लागून स्वत:चं नुकसान करून घेऊ नका.

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल; अनिल परब ठाम
अनिल परब, परिवहन मंत्री
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 3:57 PM

मुंबई: आम्ही तुमच्या विरोधात नाही. तुमचे प्रश्न सुटावेत हाच आमचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही कामावर या. राजकारण्यांच्या नादी लागून स्वत:चं नुकसान करून घेऊ नका, असं आवाहन करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधून पुन्हा एकदा कामगारांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यासाठी कोर्टाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीला कोर्टाने 12 आठवड्यांचा वेळ दिला आहे. अभ्यासासाठी दोन चार दिवस लागत नाही. त्यासाठी वेळ लागतो. विलनीकरणाचे दूरगामी परिणाम काय होतील? आर्थिक बोझा किती पडेल? याचा अभ्यास करावा लागणार आहे. सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याचा निर्णय घ्यावा लागतो. हायकोर्टाने विचार करून कालावधी दिला आहे. आम्ही दिला नाही. तोच एक पर्याय आहे. त्या मार्गाचाच अवलंब करावा लागेल. हा विषय उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल, असं परब यांनी स्पष्ट केलं. या समितीसमोर जावून कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी म्हणणं मांडावं. जो अहवाल येईल तो आम्हाला मान्य असेल. तुम्ही कामावर जा. कामावर गेले तर नुकसान होणार नाही. पण कामावर न गेल्यास नुकसान होईल. राजकीय लोकं आपल्या पोळ्या भाजून घेतील. तुमचं नुकसान कुणी भरून देणार नाही. नंतर ते तुम्हाला वाऱ्यावर सोडून देतील, असंही ते म्हणाले.

खोत, पडळकर भडकवत आहेत

गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन करत आहे. आवाहनाला प्रतिसाद देत बऱ्याच कर्मचाऱ्यांनी काम करण्याची तयारी दाखवली आहे. जे कर्मचारी कामावर येत असतील त्यांना संरक्षण देऊ. जे अडवत असतील त्यांच्यावर कारवाई करू. एसटीचे प्रश्न सोडवण्यासाठी आमची चर्चेची तयारी आहे, असं त्यांनी सांगितलं. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे संपकऱ्यांना भडकवत आहेत. कामगारांची जबाबदारी कोणी घेत नाही. कामगारांचे नुकसान झाले तर सदाभाऊ खोत किंवा गोपीचंद पडळकर त्यांची जबाबदारी घेणार नाहीत. ते हळूहळू संपापासून दूर जातील. कामगारांनी विचार करावा. सहकार्य करावं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ पुन्हा तोट्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी, असंही ते म्हणाले.

चर्चा करायला आझाद मैदानातही जाईल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एसटी कामगारांच्या प्रश्नांवर पवार बोलताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्यावरही त्यांनी पवारांचा व्हिडीओ पाहिला नाही. विलनीकरण सोडून त्यांच्या ज्या मागण्या आहेत. पगाराच्या मागणीत त्यांनी मागणी करावी. हा त्यांचा हक्क आहे. विलनीकरणाची मागणी एक दोन दिवसात होत नाही. हायकोर्टाच्या समितीने अहवाल दिला तरच त्यावर माहिती येईल, असंही त्यांनी सांगितलं. चर्चा करायला मी आझाद मैदानातही जाईल. चर्चेला तयार आहे. मी हायकोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन करू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दोषी आढळलो तर फाशी द्या

भाजप आंदोलन भरकटवायचं काम करत आहे. माझ्यावर आरोप केले तरी चालेल. चौकशी करा. चौकशीत दोषी सिद्ध झालो तर फाशी द्या. पण कामगारांचं नुकसान करू नका. त्यांनी चुकीची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे भाजप कामगारांना भडकवून आंदोलन चिघळवत आहे, असं सांगतानाच नितेश राणेचे आरोप आम्ही मोजत नाही. कोण नितेश राणे. मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची त्यांची पात्रता आहे का. त्यांना आम्ही किंमत देत नाही, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही’, राणेंच्या आरोपांना अनिल परबांचं प्रत्युत्तर

Rahul Gandhi: “केंद्र सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड, श्रीमान 56″ घाबरले”, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

मुख्यमंत्र्यांना कणा आहे का? नितेश राणेंचा खोचक सवाल, विलिनीकरणावरुन अनिल परबांना टोला, रावतेंना प्रश्न विचारण्याचं चॅलेंज

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.