Maharashtra rain : विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्य करावं, अजित पवारांचं आवाहन

तिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत बचाव, मदत कार्यात विरोधी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य, मदत करावी, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Maharashtra rain : विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्य करावं, अजित पवारांचं आवाहन
अजित पवार (संपादित छायाचित्र)Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 3:41 PM

मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि राज्यात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर समुद्र, नदी किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. राज्यातील नागरिकांची जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी 9 जुलैपर्यंत रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे. पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा हे जिल्हे 8 जुलैपर्यंत रेड अलर्टवर आहेत. मुंबई आणि ठाणे 10 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टवर आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी या सूचना केल्या आहेत.

‘तत्काळ मदत मिळेल याची निश्चिती करावी’

जिल्हा, राज्य प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. जीवित, वित्तहानी होणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. राज्य सरकारनेही एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, महसूल आदी बचाव, मदत यंत्रणांना सतर्क ठेवून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ मदत मिळेल याची निश्चिती करावी. अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत बचाव, मदत कार्यात विरोधी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य, मदत करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत 65 जणांचा बळी

राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आकडेवारीनुसार आतापर्यंत धोकादायक ठिकाणांवरून 4500 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. एक जूनपासून ते आतापर्यंत राज्यभरात पावसाने 65 जणांचा बळी घेतला आहे, तर या मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 57हून अधिक जण जखमी झाले आहेत. कोकणातील परिस्थितीदेखील गंभीर रूप धारण करत आहे. येथील नद्यांना पूर आल्याने जनजीवन ठप्प होत आहे.

'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.