Oxygen Man | त्यानं 23 लाखाची गाडी विकली अन् कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवले, मुंबईच्या देवदूताची प्रेरणादायी कहाणी
संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या भातीच्या सावटाखाली जगतो आहे (Oxygen Man Shahnawaz Shaikh). देशात अतिगंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज कितीतरी लोक आपल्या नातेवाईकांना, जवळच्यांना स्वत:च्या डोळ्यादेखत जीव गमावताना पाहात आहेत.
मुंबई : संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या भातीच्या सावटाखाली जगतो आहे (Oxygen Man Shahnawaz Shaikh). देशात अतिगंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज कितीतरी लोक आपल्या नातेवाईकांना, जवळच्यांना स्वत:च्या डोळ्यादेखत जीव गमावताना पाहात आहेत. कुणाला वेळेवर उपचार मिळत नाही, तर कुणी ऑक्सिजन पुरवठ्याच्या कमतरतेचा बळी पडतोय. यासर्वांमध्ये मुंबईत एक देवदूत लोकांच्या मदतीला धावून आला आहे (Oxygen Man Shahnawaz Shaikh Sold SUV Cost Of Rs 23 Lac For Delivering Oxygen Cylinders To Corona Patients).
शाहनवाज शेख (Shahnawaz Shaikh) असं या देवदुताचं नाव आहे. लोकांचा जीव वाचावा म्हणून त्यांनी स्वत:ची कार विकत लोकांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिले आहे. तसेच लोकांना कशा प्रकारे ऑक्सिजन उपलब्ध करुन देता येईल, यासाठी तो जिवाचं रान करत आहेत. त्यांच्या याच धडपडीमुळे तो समस्त मुंबईत ऑक्सिजन मॅन (Oxygen Man) म्हणून ओळखला जात आहेत.
शाहनवाज शेख हा एका फोन कॉलवर कोरोना रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोतवण्याचं काम करत आहे. लोकांच्या मदतीसाठी तयार त्यांच्या टीमने यासाठी एक ‘कंट्रोल रुम’ही तयार केलं आहे. जेणेकरुन रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळू शकेल.
मित्राच्या बहिणीचा ऑक्सिजनअभावी मृत्यू
सध्या कोरोना महामारीचा प्रकोप वाढल्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून घरात बसून आहेत. तसे निर्देश राज्य सरकारनेसुद्धा दिले आहेत. मात्र, सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात शाहनवाज शेख दिवसरात्र एक करुन लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याच्या एका मित्राच्या बहिणीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मित्राच्या बहिणीचा रिक्षामध्येच मृत्यू झाला. याच गोष्टीचा शाहनवाज यांना धक्का बसला आणि त्यांनी लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम करण्याचं ठरवलं.
ऑक्सिजन सिलिंडरसाठी कार विकली
मित्राच्या बहिणीचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्यानंतर शाहनवाज यांनी लोकांची मदत करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी जमेल तेवढ्या लोकांना ऑक्सिजनचे सिलिंडल देण्याचे ठरवले. त्यासाठी भांडवल उभं करण्यासाठी त्यांनी स्वत:ची 22 लाख रुपयांची SUV कार विकली. स्वत:ची फोर्ड एंडेव्हर ही कार विकत त्यांनी 160 ऑक्सिजन सिलिंडर खऱेदी केले. तसेच 40 सिलिंडर भाड्याने घेतले. असे एकूण त्यांच्याकडे सध्या 200 ऑक्सिजनचे सिलिंडर आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांच्या या कार्याचा अनेकांना फायदा होतो झाला. गरजूंना ते ऑक्सिजनचे सिलिंडर देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये त्यांनी जवळपास 4 हजार कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन सिलिंडर देऊन त्यांची मदत केली होती.
आतापर्यंत 4 हजार कोरोनाग्रस्तांची मदत
ऑक्सिजन मॅनने सांगितले की, रुग्णांना तातडीने मदत करण्यासाठी त्याच्या वतीने एक हेल्पलाइन क्रमांकही सुरु करण्यात आला आहे. शाहनवाज म्हणाला की, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा परिस्थिती अधिक कठीण आहे. जानेवारीत ऑक्सिजन मागणीसाठी त्यांना 50 कॉल येत होते, तर आज दररोज 500 ते 600 फोन येत आहेत. पण, दुर्दैव म्हणजे आता आम्ही केवळ 10 ते 20 टक्के लोकांपर्यंत पोहोचू शकलो आहोत.
त्यांच्याकडे सध्या 200 ऑक्सिजन सिलिंडर असल्याची माहिती शाहनवाज यांनी दिली. यापैकी 40 ऑक्सिजन सिलिंडर भाड्याने देण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की ज्या गरजू लोकांना येथे येऊन ऑक्सिजन सिलिंडर घेता येत नाही, आम्ही सिलिंडर त्यांच्या घरी पोचविण्यासाठी जातो. गेल्या वर्षापासून सुमारे 4000 गरजू लोकांना मदत केल्याचे शाहनवाज यांनी सांगितले.
शाहनवाज जमेल त्या पद्धतीने लोकांना मदत करत आहेत. ऑक्सिजन सिलिंडरसोबतच बेड, व्हेंटिलेटरची उपलब्धता या सर्व गोष्टींची माहिती ते याच वॉर रुममधून लोकांना देत आहेत. कोरोनाकाळातील त्यांच्या या कार्यमुळे अनेकजण त्यांचे अभिनंदन करत आहेत.
Video | Mumbai | मोफत ऑक्सिजन देण्यासाठी विकली स्वतःची कार, मुंबईतील ऑक्सिजन मॅन शहानवाज शेख#Mumbai #OxygenMan #CoronaVirus pic.twitter.com/BJPDnIDSbO
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 20, 2021
Oxygen Man Shahnawaz Shaikh Sold SUV Cost Of Rs 23 Lac For Delivering Oxygen Cylinders To Corona Patients
संबंधित बातम्या :
ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरसाठी जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी रस्त्यावर, सोबतीला मनसे; ठाण्यात वातावरण तापलं