Palghar mob lynching case : अमित शाहांशी बोललोय, आगलाव्यांना शोधायला सांगितलंय : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर हत्याकांडाबद्दल राज्य सरकारची (Uddhav Thackeray on Palghar mob lynching) भूमिका स्पष्ट केली.

Palghar mob lynching case : अमित शाहांशी बोललोय, आगलाव्यांना शोधायला सांगितलंय : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Apr 20, 2020 | 2:58 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर हत्याकांडाबद्दल राज्य सरकारची (Uddhav Thackeray on Palghar mob lynching) भूमिका स्पष्ट केली. “पालघरमधील हत्याकांड हे धार्मिक नाही, त्याला हिंदू-मुस्लिम असा रंग देऊ नका. हे हत्याकांड गैरसमजातून झालं आहे. जे जे आरोपी आहेत, त्या सर्वांच्या मुसक्या आवळल्या असून 110 लोकांना अटक केलं आहे, जे दोषी आहेत, त्यांना महाराष्ट्र सरकार सोडणार नाही”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. (Uddhav Thackeray on Palghar mob lynching)

याशिवाय हा खटला CID कडे सोपवला आहे. याप्रकरणी माझी देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनीही हा प्रकार धार्मिक नसल्याचं म्हटलं असून, मी त्यांना कारवाईचं आश्वासन दिलं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पालघरचं मॉब लिंचिंग हे धार्मिक नाही. धर्मामध्ये आग लावू नका, याप्रकरणातील कोणालाही सोडणार नाही, जे जे कोणी जबाबदार आहेत ते सर्व तुरुंगात आहेत. यामध्ये 9 अल्पवयीन आरोपी आहेत त्यांना सुधारगृहात पाठवलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सर्वांना शोधून काढून शिक्षा दिल्याशिवाय महाराष्ट्र सरकार शांत बसणार नाही. हे हत्याकांड हिंदू- मुस्लिम नाही, धार्मिक नाही, तर गैरसमजातून हल्ला झाला जो नींदनीय आहे.

गडचिंचले दुर्गम भाग गडचिंचले हे गाव पालघरपासून 110 किमी अंतरवार आहे. हे गाव अत्यंत दुर्गम भागात असून केंद्रशासित असलेल्या दादर नगर हवेलीजवळ आहे. हे साधू लवकर जाता यावे म्हणून दुर्गम भागातून जात होते. हत्याकांड घडलेला भाग दादरा नगर हवेलीजवळ आहे. दादरा नगर हवेलीत साधूंना सीमेवर अडवले. गडचिंचलेत येण्यासाठी वाव नाही, दुर्गमभाग आहे. दादरा नगर हवेलीवरुन यावं लागतं. हे साधू गुजरातला जाणार होते, दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशात रोखलं, त्यांना परत पाठवलं. त्यांना तिथे रोखून राज्य सरकारशी चर्चा करुन सल्ला मसलत केलं जाऊ शकत होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

केंद्रशासित प्रदेशात या साधूंना जाऊ दिले नाही. या भागात चोर फिरतातयत अशी अफवा होती. पालघर-दादरा नगर हवेली सीमेवर रस्ते नाहीत. दादरा नगर हवेलीत साधूंच्या गाडीवरही हल्ला झाला. हत्याकांडावेळी पोलिसांवरही हल्ला झाला. मात्र जे कोणी हल्लेखोर आहेत त्यांना सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

तर ही वेळ आली नसती

दादरानगर हवेलीमध्ये ठेऊन दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र सरकारकडे चौकशी केली गेली असती तर रितसर सरकारच्या ताब्यात त्यांना दिलं गेलं असतं तर त्यांच्यावर ही पाळी आली नसती. पण केंद्रशासित प्रदेशातून त्यांना नाकारलं गेलं. तिथून परत पाठवलं गेलं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

आम्ही गप्प बसलो नाही हत्याकांड घडताच आम्ही गप्प बसलो नाही. हत्याकांड घडले त्यावेळी किट्ट काळोख होता. पहाटे 5 वाजल्यापासून अंधारात आरोपी शोधले. 16 तारखेला हत्याकांड घडले, 17 तारखेला 100 आरोपी पकडले. सर्व आरोपी 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहे. त्यापैकी मुख्य पाच आरोपींनाही पकडले आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

दोन पोलीस निलंबित आम्ही कुणालाही सोडणार नाही, दोन पोलिसांना आम्ही निलंबित केले आहे. CID च्या क्राइम ब्रँचकडे तपास दिला आहे. हत्याकांडाला धार्मिक रंग देऊ नका. सर्व जबाबदार लोकांना पकडले आहे. 9 अल्पवयीनांनाही सुधारगृहात पाठवले आहे. दादरा नगरमध्ये पळून गेलेल्यांनाही पकडू, असं मुख्यमंत्री म्हणाले.

अमित शाहांशी चर्चा या प्रकरणावर गृहमंत्री अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्याशी बोललो. या भागात धार्मिक तेढ नसल्याची त्यांनाही कल्पना, काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आगलाव्यांना शोधायला शाहांना सांगितलंय कोरोनाचे युद्ध जिंकू, गुंडगिरीविरुद्धही जिंकू. सोशल मीडियावरच्या आगलाव्यांबद्दलही शाहांना बोललो. आगलाव्यांना शोधायला शाहांना सांगितलं आहे. तुम्ही शोधा, आम्हीही अफवा पसरवणाऱ्यांना शोधतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दंगे धोपे करणारे आणि खासकरुन सोशल मीडियावरुन आग लावण्याचा प्रयत्न जो कोणी करतंय, त्यांच्याबद्दल अमित शाहांना सांगितलं आहे.  सोशल मीडियावरुन आगी लावणारे जे कोणी आहेत, त्यांचा तुम्ही शोध घ्या, आम्हीही शोध घेतो. कारण प्रत्यक्ष एक होतं आणि आगी लावणारे दुसरे आगी लावून जातात, त्यांच्यापर्यंत झळा पोहोचतं नाहीत, त्यांना पकडणं आवश्यक आहे. अमित शाहांशी मी बोललोय, राज्य सरकारलाही सूचना दिलेल्या आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

काय आहे प्रकरण? (What is Palghar mob lynching case )

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी (16 एप्रिल) रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहनचालकासह तिघे जण होते.

दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत सर्वांना ताब्यात घेतलं. डहाणू न्यायालयाने 101 आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.