पालघर, सफाळे रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको, राजधानी एक तास रोखली
डहाणू रेल्वे स्थानकावरुन सकाळी सुटणारी चर्चगेट लोकल येत्या 3 डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
पालघर : पश्चिम रेल्वेवरील पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी (Palghar Passengers Rail Roko) आज रेल रोको आंदोलन केले. यावेळी प्रवाशांनी 1 तास मुंबईकडे जाणारी राजधानी रोखून धरली. डहाणू रेल्वे स्थानकावरुन सकाळी सुटणारी चर्चगेट लोकल येत्या 3 डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी हे आंदोलन पुकारलं (Palghar Passengers Rail Roko).
पश्चिम रेल्वे वरील मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन रद्द केल्याने दररोज पहाटे, सकाळी कामावर जाणाऱ्या शेकडो प्रवाशांची गैरसोय होत आहे. याला कंटाळून संतप्त प्रवाशांनी पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात गाड्या अडवल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आधीच नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत. त्यात अत्यावश्यक सेवेतील तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या रेल्वे गाड्या रेल्वेने अचानक बंद केल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. कामावर जाण्यास दुसरे साधन नसल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी बुधवारीपहाटेपासून पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात ट्रेन रोखून धरल्या.
नोकरीसाठी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी ट्रेन रोखून धरली. त्यानंतर पालघर रेल्वे स्टेशन मास्टरने प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन ते मुंबई सेंट्रलला पाठविण्याचे, तसेच तिथे जावून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अडविण्यात आलेली लोकल मुंबईच्या दिशेने सोडण्यात आली.
दरम्यान, सफाळे रेल्वे स्थानकातील लोकल प्रवाशांनी सर्व ट्रेन पूर्ववत होईपर्यंत रोखून धरण्याल्याने पश्चिम रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील सर्व गाड्या विविध रेल्वे स्थानकात अडकून पडल्या.
दरम्यान, काही प्रवासी मुंबई सेंट्रल कार्यालयात जावून ट्रेन रद्द करण्याविरोधात रेल्वे निवेदन देणार आहेत.
मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतरच, मुंबई महापालिका आयुक्तांचं स्पष्टीकरणhttps://t.co/uECRvT7BpB #BMC #MumbaiLocal #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 24, 2020
Palghar Passengers Rail Roko
संबंधित बातम्या :
लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना लोकलमध्ये नो एंट्री, रेल्वे प्रशासनाचा निर्णय