राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले, कोल्हापुरातील नद्यांना पूर
येत्या 4 तासात मुंबईत हवामान विभागाने मुसळधार पावसाचा ((IMD rain prediction) इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन मुंबई पोलिसांनी ट्विटद्वारे केले आहे.
मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह (Mumbai rain) कोकण, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rainfall) कोसळत आहे. कोल्हापुरातील धरणक्षेत्रात (Kolhapur rain) मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे (Radhanagri Dam) सातही स्वयंचलित दरवाजे उघडले असून 11 हजार 300 क्यूसेकने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सर्वच नद्यांना पूर (kolhapur flood) आला आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. कोल्हापुरात अशाचप्रकारे पाऊस सुरु राहिला आणि पंचगंगेच्या पाणी पातळीत एक फुटांनी वाढ झाली, तर कोल्हापुरात पुन्हा पूरस्थिती उद्भवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान सद्यस्थितीत कोल्हापुरातील 66 बंधारे पाण्याखाली गेले असून सर्वच नद्यांना पूर आला आहे.
तर दुसरीकडे मुंबईसह कोकण, कोल्हापूर, पुणे यासारख्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) पडत आहे. मुंबई, ठाणे या ठिकाणी येत्या 4 तासात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा ((IMD rain prediction) इशारा देण्यात आला होता. मात्र 4 तास उलटूनही पावसाचा जोर अद्याप कायम आहे. त्यामुळे मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन मुंबई पोलिसांनी ट्वीटद्वारे केले आहे.
त्याशिवाय राज्यात पुढील 48 तास जोरदार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा (IMD rain prediction) अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते.
The IMD authorities have indicated intense spells of rain for the next 4 hours in Mumbai & other coastal districts. Considering weather conditions, We request Mumbaikars to take adequate precautions & ensure safety. #Dial100 or contact @MumbaiPolice in case of any emergencies.
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 7, 2019
मुंबईत गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसाचा गणेशभक्तांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.