पंढरपूरातील आषाढीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार; मंदिर समितीकडून निमंत्रण; पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहरणार

| Updated on: Jun 13, 2022 | 5:48 PM

निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी चर्चाही केली. पंढरपूरातील विकास कामांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा, वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसेच परिसराच्या विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

पंढरपूरातील आषाढीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार; मंदिर समितीकडून निमंत्रण; पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहरणार
आषाढी वारीचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
Follow us on

मुंबई: पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने (Vitthal Rukmini Temple Committee) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना आषाढी एकादशीच्या (10 जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण (Mahapuja Invitation) देण्यात आले आहे. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले आहे. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी चर्चाही केली. पंढरपूरातील विकास कामांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा, वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसेच परिसराच्या विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

सोयीसुविधांची कमतरता भासू नये

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थित असते. राज्याभरातील विविध भागातून नागरिक येत असल्याने सोयीसुविधांची कमतरता भासू नये यासाठी प्रशासन नेहमीच प्रयत्नशील राहील असे अश्वासनही यावेळी देण्यात आले.

 वृक्षारोपणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती

गतवर्षी सत्यभामा मंदिर परिसरात केलेल्या वृक्षारोपणाची मुख्यमंत्र्यांनी आवर्जून माहिती घेतली. पंढरपूर मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी शासनाने 73 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत कामांबाबत यावेळी चर्चाही करण्यात आली. अशा पद्धतीने निधी देण्याचे जाहीर करून, तो लगेचच उपलब्ध करून दिल्याबद्दल समितीने यावेळी समाधान व्यक्त केले आहे.

मंदिर समितीच्यावतीने औसेकर महाराज यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा श्री विठ्ठलाची मुर्ती, वीणा, शेला-पागोटे देऊन सत्कारही करण्यात आला.