पोलीसांच्या चांगल्या कामगिरीने घबराट पसरली, करायला गेले कौतूक, झाले भलतेच

मुंबई उपनगरीय लोकलने दररोज 75 लाख प्रवासी प्रवास करीत असतात. मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरून दररोज तीन हजाराहून अधिक लोकल फेऱ्या चालविण्यात येत असतात. त्यामुळे सिंगापूरच्या लोकसंख्यापेक्षाही जास्त जण मुंबईत लोकलने रोज प्रवास करीत असतात.

पोलीसांच्या चांगल्या कामगिरीने घबराट पसरली, करायला गेले कौतूक, झाले भलतेच
grp-twitterImage Credit source: grp-twitter
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 2:35 PM

मुंबई : लोहमार्ग पोलीसांच्या ट्वीटर हॅण्डलवरून दिलेल्या एका चांगल्या कामगिरीच्या माहीतीमुळे बुधवारी सकाळी गोंधळ उडाला. लोहमार्ग पोलीस म्हणजे जीआरपीच्या ट्वीटर खात्यावर बुधवारी, “वांद्रे स्थानकातील लिफ्टमध्ये अडकलेल्या 20 प्रवाशांची जीआरपी पोलीसांनी सुटका केली आहे” असा संदेश झळकळा आणि प्रसारमाध्यमांचा गोंधळ उडाला, कसा ते वाचा !

वांद्रे स्थानकातील लिफ्टमध्ये अडकलेल्या 20 प्रवाशांची जीआरपी पोलीसांनी सुटका केली आहे असा जीआरपी म्हणजेच रेल्वे पोलीसांच्या ट्वीटर खात्यावर बुधवारी सकाळी संदेश आला, अन प्रसारमाध्यमांची धावपळ उडाली. संदेश टाकल्यानंतर लागलीच माहिती काढण्यासाठी प्रसारमाध्यमांनी फोनाफोनी सुरू केली. त्यानंतर काही वेळाने कळले की ही घटना 16 डिसेंबरच्या रात्रीची आहे, त्यामुळे ट्वीटरवर पोस्ट करताना ही घटना नेमकी कधीची आहे हे न स्पष्ट केल्याने प्रसारमाध्यमांची चांगलीच धांदल उडाल्याचे उघडकीस आले. मुंबई उपनगरीय लोकलने दररोज 75 लाख प्रवासी प्रवास करीत असतात. मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरून दररोज तीन हजाराहून अधिक लोकल फेऱ्या चालविण्यात येत असतात. त्यामुळे सिंगापूरच्या लोकसंख्यापेक्षाही जास्त जण मुंबईत लोकलने रोज प्रवास करीत असतात. त्यामुळे मुंबई लोकलचा रोजचा प्रवास धकाधकीचा असल्याने एकही चुक अनेकदा अनेकांचे प्राण घेते. एलफिन्स्टन रोडची चेंगरा चेंगरी तर सप्टेंबर महिन्यात अचानक पडलेल्या पावसाने लोकांची गर्दी झाल्याने घडली होती.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातील लिफ्टमध्ये प्रवासी अडकल्याची घटना यावर्षी 26 ऑगस्ट रोजी घडली होती. अंधेरी स्थानकात ऐनगर्दीच्या वेळी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास लिफ्ट अचानक बंद पडल्याने आत दहा ते पंधरा प्रवासी अडकून पडले होते. या प्रवाशांना काढण्यासाठी अखेरीस लिफ्ट दुरूस्ती करणाऱ्यांना बोलावण्यात आले होते. मोठ्या मुश्कीलीने अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आत अडकलेल्या प्रवाशांची कशीबशी सुटका झाली होती.

बुधवारी सकाळी जीआरपीच्या ट्वीटर खात्यावर आलेल्या संदेशाने या आठवणी जाग्या झाल्या. मात्र पश्चिम रेल्वेने जाहीर केले की ही घटना आजची नसून 16 डिसेंबरची असून त्यावेळी क्षमतेपेक्षा जादा प्रवासी लिफ्टमध्ये चढल्याने लिफ्ट बंद झाली होती. तिची दुरूस्ती वेळेत होऊन प्रवाशांची सूटका वेळेत करण्यात आली असल्याचे सांगितले आणि प्रसारमाध्यमांची बातमी शोधण्याची गडबड अखेर शांत झाली.

अशा महत्वाच्या शहराची सुरक्षा राखणाऱ्या रेल्वे पोलीसांनी सजग राहणे अपेक्षित असताना ट्वीटरवर कामगिरी पोस्ट करताना संबंधित घटना नेमकी कधीची आहे, हेच न सांगितल्याने हा गोंधळ उडाल्याचे स्पष्ठ झाले आहे. त्यानंतर हे ट्वीट जीआरपीने खात्यावरून डीलीट केले.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....