पंकजा मुंडे यांना डावललं जातंय, जयंत पाटील यांची भाजपवर टीका
मराठा समाजाबद्दल तानाजी सावंत यांचं वक्तव्य धक्कादायक आहे.
Tv 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात पक्षांतर्गत चर्चा पक्षाच्या बैठकीत झाली. राज्यातील वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचे प्रश्न समजून घेण्यात आले. राज्यात राष्ट्रवादीचं दोन दिवसीय शिबिर शिर्डी येथे चार व पाच नोव्हेंबरला होणार आहे. प्रमुख कार्यकर्ते या शिबिरात उपस्थित राहतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
भाजप पंकजा मुंडे यांना म्हणावं तसं महत्त्व देत नाही. गोपीनाथ मुंडे यांनी कष्ट घेतले. त्यांना काही भागातील लोकं पाठिंबा देत असतात. पण, पंकजा मुंडे यांचं महत्त्व कमी करण्याचं काम होतंय. त्यामुळं पंकजा आपलं मत व्यक्त करत असल्याचं दिसतं, असं जयंत पाटील म्हणाले.
तर बंदी घालणे योग्य
देशविघातक कृत्य करणाऱ्या संघटनेवर बंदी घाला, अशी मागणी केली आहे. हत्या करणे, दहशतवादी कारवाया करणे, अशी प्रणाली असेल, तर त्यावर बंदी घालणे योग्य आहे, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले.
2014 साली अशोक चव्हाण यांना शिवसेनेने चर्चा केली असेल, तर मला नक्की तपशील माहिती नाही. पण, अशोक चव्हाण म्हणत असतील, तर त्यात तत्थ्य असेल.
तानाजी सावंतांचं वक्तव्य धक्कादायक
मराठा समाजाबद्दल तानाजी सावंत यांचं वक्तव्य धक्कादायक आहे. मला असं वाटतं की, मुख्यमंत्र्यांची भूमिका तानाजी सावंत मांडत आहेत.
सर्वांना गॅस सिलिंडर वापरण्यासाठी सांगण्यात आलं. सर्वांना अनुदान देण्यात आलं. गॅसचा व्यवसाय सरकार करत, असं वाटतं. खुल्या बाजारातून गॅस खुला करावा लागेल. एक हजारात येवढा गॅस उपलब्ध आहे. पण, त्यानंतर लागला तर खुल्या बाजारातून घ्यावा, यामुळं सामान्य नागरिक नाराज होणार आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
मोठा वर्ग संपत्तीपासून लांब
देश श्रीमंत झाला.पण लोकं श्रीमंत नाहीत, असं नितीन गडकरी म्हणाले. हे वास्तव आहे. देशात श्रीमंतांची संख्या मुठभर आहे. गरिबांची संख्या खूप जास्त आहे. मोठा वर्ग संपत्तीपासून लांब आहे. श्रीमंत-गरिबीची दरी आणखी वाढली आहे. हेच गडकरी आपल्या वक्तव्यातून सांगतात, असंही पाटील यांनी सांगितलं.