मुंबई पोलीस आयुक्तांच्या फ्रेममध्ये परमबीर सिंग यांना अद्याप स्थान नाही
परमबीर यांचा फोटो लावण्यासाठी नव्या जागेचा शोध घेतला जातोय. मात्र सध्या त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे आणि होत असलेल्या गंभीर आरोपामुळे कदाचित त्यांना या रांगेत अद्याप स्थान मिळाले नाही अशी चर्चाही सुरु आहे.
मुंबई : मुंबईच्या आयुक्तपदाचा कार्यकाळ झाल्यानंतर आयुक्त म्हणून ज्या अधिकाऱ्याने जबाबदारी स्वीकारली त्यांचा फोटो फ्रेम करून लावला जातो. पोलीस आयुक्तलयातील जुन्या इमारतीत हे सगळे फोटो लावले जातात मात्र परमबीर सिंग यांचा फोटो अद्याप तेथे नाही. जागेअभावी हा फोटो लावण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितलंय. मात्र फरार घोषित करण्यात आलेल्या परमबीर यांच्यावर झालेल्या आरोपींचीही चर्चा सुरू आहे.
परमबीर यांचा फोटो त्या रांगेत लावण्याचा प्रयत्न झाला मात्र अपुऱ्या जागेमुळे तो लावता आला नसल्याचं वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं. परमबीर यांचा फोटो लावण्यासाठी नव्या जागेचा शोध घेतला जातोय. मात्र सध्या त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे आणि होत असलेल्या गंभीर आरोपामुळे कदाचित त्यांना या रांगेत अद्याप स्थान मिळाले नाही अशी चर्चाही सुरु आहे. स्वातंत्र्यानंतर परमबीर सिंग यांची मुंबईचे 43 वे आयुक्त म्हणून नेमणूक होती. याआधीच्या 42 माजी पोलीस पोलीस आयुक्तांचे फोटो फ्रेम करून पोलीस आयुक्त कार्यालयात लावण्यात आलेत.
परमबीर सिंग फरार घोषित
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गोरेगावातील वसुली प्रकरणात अनेक वेळा समन्स पाठवून हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, सिंग यांनी त्याला दाद दिली नाही. त्यामुळे गुन्हे अन्वेषण विभागाने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात सिंग यांना फरार घोषित करण्याबाबतचा अर्ज दिला होता. कोर्टाने हा अर्ज मंजूर केला आहे. सिंग यांच्यासह रियाज भाटी आणि विनय सिंग यांनाही कोर्टाने फरार घोषित केलं आहे. हे तिघे 30 दिवसाच्या आत कोर्टासमोर हजर न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त केली जाणार आहे.
महाराष्ट्र पोलीस खात्यात अनेक महत्वाच्या पदांवर काम
परमबीर सिंग 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र पोलिस खात्यात अनेक पदांवर काम केलं. ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख देखील होते. त्यांनी सुरुवातीला ठाण्याचे पोलिस उपायुक्त म्हणून देखील काम केलं. यानंतर 2015 मध्ये त्यांची ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात झाली. परमबीर सिंह यांनी चंद्रपूर आणि भंडऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केलं आहे. परमबीर सिंग यांच्या नेतृत्वाखील ठाणे पोलिसांनी देशभरात गाजलेल्या प्रकरणांचा तपास केला. ठाणे पोलिसांनी मीरा रोड कॉल सेंटर प्रकरणी इक्बाल कासकरला अटक केली. ठाणे पोलिसांनी परमबीर सिंह यांच्या नेतृत्वात सैन्य भरती प्रकरण, अमेरिकेच्या ड्रगविरोधी पथकाने लक्ष घातलेल्या 2000 कोटींचं ड्रग प्रकरण, बेकायदेशीर कॉल रेकॉर्डींग प्रकरण यांचा तपास केला. (Parambir Singh still has no place in the frame of Mumbai Police Commissioner)
इतर बातम्या
राज्य सरकार एसटीबाबत मोठ्या निर्णयाच्या तयारीत! संपावर तोडगा निघाला नाही तर खासगीकरणाचा विचार?