Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी निश्चित? विवेक फणसाळकरांच्या नावाची जोरदार चर्चा

गेल्या 2 तासांपासून पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक सुरु आहे. आता गृहमंत्री अनिल देशमुखही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले आहेत.

पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी निश्चित? विवेक फणसाळकरांच्या नावाची जोरदार चर्चा
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 6:49 AM

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात राज्य सरकार डॅमेट कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळतंय. कारण, गेल्या 2 तासांपासून पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक सुरु आहे. आता गृहमंत्री अनिल देशमुखही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले आहेत. अशातच परवीरसिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.(Paramvir Singh likely to be removed from the post of Mumbai Police Commissioner)

सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री कमी पडल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांचाही राजीनामा घेण्याची मागणी विरोधक करत होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री आणि राज्य सरकारचं कामकाज योग्यरित्या सुरु असल्याचं म्हटलंय. तसंच गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा मुद्दाही त्यांनी खोडून काढला आहे. त्यानंतर आता मुंबई पोलीस आयुक्त बदलाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परमवीर सिंग यांच्या जागी विवेक फणसाळकर यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली जाईल, असं सांगण्यात येत आहे.

कोण आहेत विवेक फणसाळकर?

विवेक फणसाळकर हे 1989च्या बॅचचे अधिकारी आहेत. फणसाळकर यांच्याकडे सध्या ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कारभार आहे. जुलै 2018 मध्ये फणसाळकर यांच्याकडे ठाणे पोलीस आयुक्तपदाचा कारभार सोपवण्यात आला होता. परमवीस सिंग यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय झाल्यास त्यांच्या जागी शिवसेनेकडून फणसाळकर यांचं नाव पुढे केलं जाण्याची दाट शक्यता आहे.

पोलीस आयुक्तांच्या बदलीबाबत पवार काय म्हणाले?

राजधानी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेसला रामराम ठोकलेले केरळमध्ये मोठे नेते पीसी चाको यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. त्यावेळी पत्रकारांनी पवारांना सचिन वाझे प्रकरणावर प्रश्न विचारले. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली होणार का? असा प्रश्नही पवारांना विचारण्यात आला. त्यावेळी त्याबाबत मी काय सांगणार. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच काय ते सांगू शकतील. हा निर्णय त्यांच्या अखत्यारित येत असल्याचं पवार म्हणाले होते. मात्र, गृहमंत्रीबदलाच्या चर्चेचं पवारांनी खंडन केलं.

संबंधित बातम्या :

VIDEO: त्या PPE किटमध्ये सचिन वाझे? NIA चा संपूर्ण तपास ह्या 49 सेकंदाच्या व्हिडीओभोवती फिरतोय, कसा लागणार छडा? वाचा सविस्तर

Sachin Vaze case : ‘त्या’ मर्सिडीजच्या डिक्कीत कोणतं गूढ दडलंय? NIA अधिकाऱ्यांकडून शोध सुरु

देशमुखांचा राजीनामा घेणार का? मुंबई पोलीस आयुक्त बदलणार का? पवार हसून म्हणाले…

Paramvir Singh likely to be removed from the post of Mumbai Police Commissioner

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.