गोविंद ठाकूर, प्रतिनिधी, मुंबई : शाळेत सकाळी अजान सुरू झाली. त्यामुळे पालकांमध्ये खळबळ सुरू झाली. अजानचे प्रकरण नेत्यांपर्यंत पोहचलं. त्यामुळे भाजप आणि शिंदे यांची शिवसेना तसेच मनसेही आक्रमक झाली. अल्पसंख्याक व्यक्तीने शाळेत अजान सुरू केली. हिंदू विद्यार्थ्यांचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. आज अजान करण्यास सांगितले, उद्या नमाज शिकवले जाईल, असा धोका काही पालकांनी व्यक्त केला.
कांदिवलीच्या शाळेत लाऊड स्पीकरवर आजान लावल्याने मोठा वाद झाला. संपुर्ण परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. अजान लावणाऱ्या शिक्षिकेला निलंबित केल्यानंतर शाळेविरोधातील आंदोलन मागे घेण्यात आले. शिवसेनेकडून, भाजपकडून शाळेने अजान लाऊड स्पीकरवर लावला. त्यानंतर पालकांच्या भावना दुखल्यामुळे या विरोधात कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
शाळेच्या म्हणण्यानुसार, आमच्या शाळेत प्रत्येक धर्माच्या प्रार्थना विद्यार्थ्यांना समजावे म्हणून आम्ही त्या लाऊड स्पीकरवर लावतो. मग त्यामध्ये गायत्री मंत्र असेल कॅरोल सिंगिंग असेल किंवा मग इतर धर्मियांच्या प्रार्थना असतील त्या विद्यार्थ्यांना समजाव्यात यासाठी हा उपक्रम असतो.
नमाजाच्या वेळी अजान वाजवल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर कांदिवलीच्या कपोल शाळेतील वातावरण सकाळपासूनच तापले आहे. शिवसेना, भाजप आणि मनसेनंतर आता समाजवादी पक्षाची एन्ट्री झाला आहे.
समाजवादी पक्षाच्या चारकोप विधानसभेचे अध्यक्ष अजहर सिद्दीकी यांनी सार्वत्रिक स्वरूपाच्या अंतर्गत अजान वाजवले. परंतु त्याच्या नावावर एका विशिष्ट धर्माची बदनामी केली जात आहे. यामागे कोण आहे, याचा पोलिसांनी तपास करून कारवाईची मागणी केली आहे. अजहर सिद्दीकी यांनी कांदिवली पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
गेल्या आठवड्यात मालेगावात करिअर गाईडन्सच्या नावाखाली कॉलेजमध्ये धर्मांतराचे धडे देण्यात आल्याचा आरोप झाला. पालकमंत्री दादा भुसे यांनी कॉलेज प्रशासन आणि पोलिसांना धारेवर धरले होते. आता कांदिवलीच्या शाळेत अजानवरून राडा झालाय. शाळेत अजान का लावली. यामागे नेमका हेतू काय. याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.