मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गर्दीतून होणार सुटका, दादर रेल्वेस्थानकाचा फलाट क्र.1 दोन मीटर रुंद होणार

मध्य रेल्वे्च्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोनवर प्रचंड अरूंद फलाटांमुळे प्रचंड गर्दी होत असते. हे फलाट आता रूंद करण्याची योजना आहे.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गर्दीतून होणार सुटका, दादर रेल्वेस्थानकाचा फलाट क्र.1 दोन मीटर रुंद होणार
DADARImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 3:37 PM

मुंबई : मध्य रेल्वेच्या ( CENTRAL RAILWAY ) दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र.1 आणि 2 वरील गर्दीची कोंडी लवकरच फुटणार आहे. नेहमीच गर्दीने तुंडुब भरलेल्या या फलाटावर लोकल पकडताना केव्हा मोठा अपघात होऊ शकतो अशी गंभीर परिस्थिती असते. लोहमार्ग पोलिस ( GRP ) गेली अनेक वर्षे येथे प्रवाशांची काळजी घेत असतात, आता धोकादायक ठरलेला फलाट क्र 1 दोन मीटरने रुंद करण्याची रेल्वेची योजना आहे. त्यामुळे दादर ( DADAR ) स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोन वरील जीवघेण्या कसरतीतून प्रवाशांची लवकरच सुटका होणार आहे.

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात वाढती गर्दी आणि अपुरी जागा यामुळे लोकल पकडताना रोजची जीवघेणी करसत असते. या फलाटावर लोकल पकडताना अनेकजणांना दुखापती झाल्या आहेत. तर प्रवाशांचा जीवही गेला आहे. दादर स्थानकात मोठा बाजार आणि खरेदीसाठी देखील लोक येत असतात. शिवाय सणासुदीला तर दादर स्थानकात मुंगी शिरायलाही वाव नसतो. या स्थानकातील मरेचा फलाट क्र.2 दोन मीटरने रूंद करण्याची योजना असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी म्हटले आहे.

काय आहे योजना

दादरचा फलाट क्र.1 दोन मीटरने रूंद करण्याची योजना आहे. येथे सरकता जिना बसविण्याची देखील योजना असल्याचे विभागीय व्यवस्थापक गोयल यांनी मिड डेशी बोलताना सांगितले आहे. मास्टर प्लानप्रमाणे या संपूर्ण स्थानकात प्रवाशांना अधिक जागा मिळण्यासाठी कही बदल करण्याची योजना आहे. परंतू त्यासाठी आवश्यक मंजूऱ्या घेण्याचे काम शिल्लक असल्याचे डीआरएम रजनीश कुमार गोयल यांनी सांगितले. त्यानंतर अधिक माहिती देता येईल असेही ते म्हणाले. येत्या 15 ते 20 दिवसात या संदर्भात आवश्यक प्रस्तावाचे सादरीकरण केले जाईल त्यानंतर त्यास अंतिम स्वरूप प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दोन्ही बाजूने लोकलमध्ये चढता आणि उतरता येणार

मध्य रेल्वे अलिकडेच दादरचा फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरण करून प्रवाशांना अधिक जागा तयार केली जाणार आहे. येथे डबल डिस्चार्ज फलाटची सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे, त्या फलाट क्र.पाचवर दोन्ही बाजूने लोकलमध्ये चढता आणि उतरता येणार आहे. आम्ही जुन्या एलिवेटेड डेकचा फाऊंडेश कुठे आहे त्यात काही बदल करता येईल का ? या सर्वबाबींचा अभ्यास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या स्टेशनमध्ये प्रवाशांसाठीचे अडथळे दूर करून अधिक जागा तयार करण्याच्या मास्टर प्लानवर काम करीत आहोत असे त्यांनी सांगितले.

मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी त्यांचा पदभार स्विकारताच कल्याण आणि ठाणे स्थानकाला नोव्हेंबर 2022 मध्ये भेट दिली होती. आमची ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची हालचाल मुक्त व्हावी त्यांना अधिक मोकळी जागा मिळावी यासाठी आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांनी तातडीने दिलासा देण्यासाठी 18 लांबपल्ल्यांच्या गाड्यांचे फलाट बदलेले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.