26/11 च्या थरारक हल्ल्यातून वाचलेल्या डॉक्टरवर काळाचा घाला, टेम्पोने उडवलं

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आपल्या दोन मुलांसह त्यांनी प्राण गमावले. भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने नॅनो कारला उडवलं. नायगाव येथे राहणारे पास्टर डॉक्टर थॉमस उलेदर हे पत्नी मेरी आणि 10 वर्षांचा मुलगा बेनी, 5 वर्षांचा दुसरा मुलगा इझायल हे त्या नॅनो कारमध्ये प्रवास करत होते. यावेळीच हा अपघात झाला.

26/11 च्या थरारक हल्ल्यातून वाचलेल्या डॉक्टरवर काळाचा घाला, टेम्पोने उडवलं
Follow us
| Updated on: Jul 03, 2019 | 11:29 PM

वसई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून वाचलेले पास्टर डॉ. थॉमस उलेदार यांच्यावर काळाने घाला घातलाय. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आपल्या दोन मुलांसह त्यांनी प्राण गमावले. भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने नॅनो कारला उडवलं. नायगाव येथे राहणारे पास्टर डॉक्टर थॉमस उलेदर हे पत्नी मेरी आणि 10 वर्षांचा मुलगा बेनी, 5 वर्षांचा दुसरा मुलगा इझायल हे त्या नॅनो कारमध्ये प्रवास करत होते. यावेळीच हा अपघात झाला.

थॉमस यांचं कुटुंबीय विरारला आपल्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी जात होते. गुजरात लेनवरन जाताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या एका टेम्पोने नॅनो कारला उडवलं आणि फरार झाला. कार दुसऱ्या मुंबई लेनवर येऊन पडल्यानंतर दुसऱ्या टेम्पोने पुन्हा उडवलं. या अपघातात पास्टर डॉक्टर थॉमस उलेदर आणि त्यांच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी मेरी गंभीर जखमी झाल्या.

मेरी यांच्यावर वसईच्या प्लॅटिनम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसईच्या सातीवली ब्रिजवर काल सायंकाळी साडे सहा वाजता हा अपघात झाला होता.  फरार टेम्पोला पालघर जिल्ह्यातील कासा पोलिसांनी पकडलं आहे.

26/11 ला कामा हॉस्पिटलमध्ये दहशतवादी कसाब आणि अब्बू इस्माइल यांच्या गोळीबारातून डॉक्टर थॉमस उलेदर वाचले होते. आपल्या बहिणीच्या डिलीवरीसाठी ते हॉस्पिटलमध्ये गेले असतानाच दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी डॉक्टर थॉमस उलेदर यांच्यासोबत त्यांचे भावजी आणि मित्रही होते. त्या तिघांना कसाब आणि अब्बू इस्माइल यांनी बंधक बनवलं होतं. दहशतवाद्यांच्या तावडीने थॉमस वाचले होते. मात्र कालच्या अपघातात अखेर काळाने त्यांच्यावर घाला घातला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.