Lockdown: ग्राहकांची घर खरेदीकडे पाठ, मजूर नसल्याने अनेक प्रकल्प अर्धवट; बिल्डरांना दुहेरी फटका

आगामी काळात बांधकाम क्षेत्र अधिक तोट्यात जाऊन घरांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याचा धोका आहे. | Real estate lockdown

Lockdown: ग्राहकांची घर खरेदीकडे पाठ, मजूर नसल्याने अनेक प्रकल्प अर्धवट; बिल्डरांना दुहेरी फटका
सध्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर गावी परतले आहेत.
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 11:50 AM

नवी मुंबई: एरवी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तावर बांधकाम क्षेत्रात मोठी तेजी दिसून येते. या दिवशी अनेक ग्राहक घरखरेदी करत असल्याने या क्षेत्रात चैतन्याचे वातावरण असते. मात्र, यंदा कोरोना आणि लॉकडाऊनच्या (Lockdown) संकटामुळे बांधकाम क्षेत्रावर संक्रांत ओढवल्याचे चित्र आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात अक्षय्य तृतीयेला अत्यंत विदारक चित्र दिसून आले. (Recession in real estate sector due to Lockdown in Maharashtra)

घरांच्या किंमती कमी करूनही ग्राहक गुंतवणूक करायला तयार नाहीत. त्यामुळे सध्या बांधकाम क्षेत्रावर निराशेचे ढग दाटल्याची माहिती बालाजी डेल्टा ग्रूपच्या बाबूभाई पटेल यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे आगामी काळात बांधकाम क्षेत्र अधिक तोट्यात जाऊन घरांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याचा धोका आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर गावी परतले आहेत. त्यामुळे मुंबईसह प्रमुख शहरांतील अनेक बांधकाम प्रकल्पांचे काम रखडले आहे. तसेच गेल्या दोन वर्षांमध्ये सिमेंट, रेती, स्टीलच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. हे सगळे ठरवून केले जात आहे. अशावेळी सरकारने बांधकाम क्षेत्राला सवलती देऊन मदत केली पाहिजे. अन्यथा आगामी काळात बांधकाम उद्योजक आपला खर्च वसूल करण्यासाठी घरांच्या किंमती आणखी वाढवतील, असे बाबूभाई पटेल यांनी म्हटले.

Gold: लॉकडाऊनमुळे सराफा व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका; 800 कोटींचे नुकसान

ऑक्सिजनमुळे स्टीलचा तुटवडा

इमारतींच्या बांधणीसाठी बांधकाम क्षेत्राला मोठ्याप्रमाणाव स्टीलची गरज लागते. या स्टील निर्मितीसाठी ऑक्सिजनची गरज लागते. मात्र, सध्या कोरोना संकटामुळे सरकारने सर्व औद्योगिक प्रकल्पांचा ऑक्सिजन पुरवठा बंद केला आहे. परिणामी बांधकाम क्षेत्राला स्टीलचा तुटवडा जाणवत असल्याचे बाबूभाई पटेल यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

लॉकडाऊनमध्ये राज्यातील व्यापार क्षेत्राचे तब्बल 70 हजार कोटीचे नुकसान – ललित गांधी

लॉकडाऊन वाढल्यामुळे व्यापारी ठाकरे सरकाविरोधात आक्रमक; तोडगा न काढल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

Locdkown: औरंगाबादमधील इंग्रजी शाळांवर कोरोनामुळे गंडांतर; 40 टक्के इंग्रजी शाळा बंद पडणार

(Recession in real estate sector due to Lockdown in Maharashtra)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.