एल्गार परिषद कार्यकर्त्यांचा मोठा खुलासा, लॅपटॉप हॅक करून वादग्रस्त कागदपत्र ठेवल्याचा आरोप

एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अटकेत असलेले वकील, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते यांची तात्काळ सुटका करण्यासाठी याचिका केली आहे. या याचिकेत मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

एल्गार परिषद कार्यकर्त्यांचा मोठा खुलासा, लॅपटॉप हॅक करून वादग्रस्त कागदपत्र ठेवल्याचा आरोप
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 5:20 PM

मुंबई : शरजील उस्मानीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा चर्चेत आलेल्या एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अटकेत असलेले वकील, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते यांची तात्काळ सुटका करण्यासाठी याचिका केली आहे. या याचिकेत मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये काही महत्वाची कागदपत्रे सापडली होती. रोना विल्सन यांचा लॅपटॉप हॅक करुन त्यात वादग्रस्त बाबी ठेवल्याचा आरोप आता एल्गार परिषदेकडून करण्यात येत आहे. अटकेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला होता. या कटाबाबतची माहिती लॅपटॉपमध्ये सापडल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला होता. त्याच आधारावर आतापर्यंत सुमारे 16 सामाजिक कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.(Petition from Elgar Parishad in Mumbai High Court, big revelation in Rona Wilson case)

अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांना UAPA कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आल्यामुळे जामीनही मिळत नाही. मात्र, आता एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मोठा आरोप केला आहे. रोना विल्सन यांच्या जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपची हार्ड डिस्क क्लोन करुन आरोपीच्या नातेवाईकांना देण्यात आली होती. त्या हार्ड डिस्कचा नातेवाईक आणि कार्यकर्ते यांनी समांतर तपास केला आहे.

फॉरेन्सिक ऑडिओ रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती

हार्ड डिस्क अमेरिकेतील Arsenal consulting या खासगी कंपनीकडे तपासासाठी पाठवण्यात आली होती. त्याचा फॉरेन्सिक ऑडिओ रिपोर्ट आता आला आहे. या रिपोर्टनुसार रोना विल्सन यांचा लॅपटॉप हॅक करुन त्यात वादग्रस्त कागदपत्र टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे. Arsenal consulting कंपनीला गेल्या 20 वर्षाचा अनुभव आहे. ही कंपनी अशाच पद्धतीचा तपास करत आली आहे. महत्वाची बाब म्हणजे या अहवालाची दखल अमेरिकेतील वृत्तपत्रांनीही घेतली आहे. वॉशिंग्टन पोस्टमध्ये याबाबत मोठा वृत्तांत प्रसिद्ध झाला आहे. या अहवालाच्या अधारावरच ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

याचिकेतील प्रमुख मागण्या

1) अटकेत असलेल्या वकील, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते यांना तात्काळ सोडण्यात यावं.

2) त्यांच्या वरचे गुन्हे रद्द करावे.

3) ज्यांनी हा खोटा पणा केला आहे. कॉम्प्युटर हॅक करून वादग्रस्त पोस्ट त्यात टाकली आहे , त्या व्यक्तीवर कारवाई करावी. अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

आतापर्यंत कुणाला अटक?

6th June 2018

सुधीर ढवळे ऍड. सुरेंद्र गडलिंग महेश राऊत रोना विल्सन शोमा सेन

28th August 2018

वरवरा राव अरुण फरेरा वर्णन गोंन्सलविस सुधा भारद्वाज

14th April 2020

डॉ. आनंद तेलतुंबडे गौतम नवलाखा

28th July 2020

हनी बाबू

7th September 2020

सागर गोरखे रमेश गायचोर

8th September 2020

ज्योती जगताप

9th October 2020

स्टॅन स्वामी

संबंधित बातम्या :

हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार

हिंदू समाज सडका झालाय म्हणणारा शरजिल उस्मानी कोण आहे?

हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार

Petition from Elgar Parishad in Mumbai High Court, big revelation in Rona Wilson case

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.