Petrol Crisis : महाराष्ट्रात पेट्रोलचा कृत्रिम तुडवडा निर्माण केला जातोय का? नागपूर, लातूर, बीडमध्ये ठणठणाट

केंद्र सरकारने कोणतीही पूर्णकल्पना न देता पेट्रोल, डिझेलवरील एक्साइज ड्यूटी कमी केली. या निर्णयामुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आलाय. अशावेळी राज्यातील विविध शहरात मोठी पेट्रोल टंचाई पाहायला मिळत आहे.

Petrol Crisis : महाराष्ट्रात पेट्रोलचा कृत्रिम तुडवडा निर्माण केला जातोय का? नागपूर, लातूर, बीडमध्ये ठणठणाट
राज्यात पेट्रोल-डिझेलच्या तुटवडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 7:05 PM

मुंबई : केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल, डिझेलच्या (Petrol Diesel) एक्साइज ड्यूटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रापाठोपाठ केरळ, ओडिशा, महाराष्ट्र या राज्यांनी देखील व्हॅटमध्ये कपात केली. एक्साइज ड्यूटी आणि व्हॅटमध्ये करण्यात आलेल्या कपातीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटरमागे 10 रुपयांपेक्षा अधिक स्वस्त झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या (Central and State Government) या निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे पेट्रोल पंप चालक नाराज झाले आहेत. केंद्र सरकारने कोणतीही पूर्णकल्पना न देता पेट्रोल, डिझेलवरील एक्साइज ड्यूटी कमी केली. या निर्णयामुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या (Petroleum Dealers Association) वतीने करण्यात आलाय. अशावेळी राज्यातील विविध शहरात मोठी पेट्रोल टंचाई पाहायला मिळत आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराज पेट्रोल विक्रेत्यांकडून आता मंगळवारी 31 मे रोजी सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यात येणार आहे. मंगळवारी पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारचा जो साठा शिल्लक राहिल तेवढाच मंगळवारी विक्री करण्यात येईल अंस पेट्रोल पंप चालकांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात दोन दिवस पेट्रोलचा मोठा तुटवडा भासण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

नागपुरात पेट्रोल डिझेलचा मोठा तुटवडा

डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या कंपण्यांकडून पुरेसा पुरवठा होत नसल्यानं नागपुरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे. ही समस्या घेऊन आज नागपूरात ‘विदर्भ पेट्रोल-डिझेल असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि तेल कंपण्यांकडून पुरेसा पेट्रोल – डिझेलचा पुरवठा करण्यात अशी मागणी केलीय. पेट्रोलपंप चालकांनी तेल कंपन्यांना ॲडव्हान्स पैसे दिले आहेत. तरीही आम्हाला पेट्रोल – डिझेलचा पुरेसा पुरवठा होत नाही. तेल कंपन्या केंद्र सरकारकडून दर वाढीची मागणी करत आहेत, मागणी मान्य होत नसल्याने तेल कंपन्यांनी पेट्रोल – डिझेलचा पुरवठा कमी केला आहे. तेल कंपन्या आणि केंद्र सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणी नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आलीय. आपल्या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ‘विदर्भ पेट्रोल डिझेल असोसीएशन’ने मंगळवारी एक दिवसांच्या लाक्षणिक संपाचा इशारा दिलाय.

हे सुद्धा वाचा

लातूर जिल्ह्यात डिझेल टंचाई

लातूर जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपावर डिझेल टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील अनेक पंपांवर झिझेलसह पेट्रोल संपल्याच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. डिझेलसाठी वाहनधारकांची भटकंती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. उद्या पेट्रोल पंप चालक त्यांच्या काही मागण्यांसाठी बंद पुकारणार आहेत. मागच्या आठवड्यात अचानक पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्याने बुकिंग केलेल्या पंप चालकांना लाखोंचा फटका बसला आहे. अशावेळी उद्याच्या बंदमुळेही पुन्हा फटका बसू नये याची काळजी पंप चालक घेताना दिसत आहेत. सोलापूरच्या डेपोतच पेट्रोल डिझेलची टंचाई असल्यामुळे अडचण झाली असल्याचं पेट्रोलपंप चालकांकडून सांगण्यात येत आहे.

आष्टीमध्ये पेट्रोल पंपावर भल्यामोठ्या रांगा

बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातही पेट्रोल पंपावर भल्यामोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. शहरातील पाच पेट्रोल पंपापैकी चार पंप बंद असल्यामुळे एका पंपावर नागरिकांच्या रांगला लागल्याचं दिसतं. पुढील दोन-तीन दिवस पेट्रोल-डिझेल मिळणार नसल्याची अफवा शहरात उठल्यामुळे गोंधळ पाहायला मिळतोय. त्यामुळे पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पंपावर मोठी गर्दी होत आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.