Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : सत्तेतल्या पक्षांनी रस्त्यावर बसायचं नसतं, मोदींनी करुन दाखवलं आता तुमची बारी, फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांना कोपरखळ्या

केंद्रातील मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसाचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सिद्ध केले आहे. गरिब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात. या निर्णयांमधून त्यांनी हेच प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे." असे ट्विट फडणवीसांनी केले आहे.

Petrol Diesel Price : सत्तेतल्या पक्षांनी रस्त्यावर बसायचं नसतं, मोदींनी करुन दाखवलं आता तुमची बारी, फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांना कोपरखळ्या
सत्तेतल्या पक्षांनी रस्त्यावर बसायचं नसतं, मोदींनी करुन दाखवलं आता तुमची बारी, फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांना कोपरखळ्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 8:28 PM

नवी दिल्ली : केद्र सरकारकडून आज एक मोठी घोषणा करण्यात आली. पेट्रोल 9.5 रु, डिझेल 7 रुपयांनी (Petrol Diesel Price) स्वस्त होणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. तसेच घरगुती गॅस सिलिंडरवरही (Gas Cylinder Price) 200 रुपये सबसिडी जाहीर केली आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत केंद्राचे आभार मानले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावरूनच कोपर खिळ्या मारल्या आहेत. फडणवीसांनी ट्विट करत लिहिलं आहे की, “मोठी बातमी :पेट्रोल 9.5 रु/लिटर, डिझेल 7 रु/लिटर ने स्वस्त होणार! पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रतिलिटर केंद्रीय कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Modi) आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे अनेकानेक आभार! केंद्रातील मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसाचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सिद्ध केले आहे. गरिब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात. या निर्णयांमधून त्यांनी हेच प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे.” असे ट्विट फडणवीसांनी केले आहे.

फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

तसेच ते पुढे ट्विटमध्ये लिहितात की, आता माझी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, त्यांनी पुढाकार घेत पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी आणि सामान्यांना आणखी दिलासा द्यावा. कारण, महाराष्ट्रातील दर हे सर्वाधिक आहेत. सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते, तर जनतेला दिलासा द्यायचा असतो, असा टोला फडणवीसांनी लगावाला आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

चंद्रकांत पाटील यांचीही दर कमी करण्याची मागणी

या निर्णयामुळे देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर देशभरातील 22 राज्यांनी त्या त्या राज्यात इंधनावरील कर कमी केल्यामुळे तेथील जनतेला आणखी दिलासा मिळाला. परंतु, महाराष्ट्रात मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्यास नकार दिला. परिणामी महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांमध्ये लोकांना पेट्रोल डिझेल स्वस्त मिळते पण महाराष्ट्रात मात्र दिलासा नाही. मोदी सरकारने आता दुसऱ्यांदा इंधनावरील कर कमी केल्यानंतर तरी महाविकास आघाडी सरकारने जनतेला दिलासा दिलासा पाहिजे व हे कर कमी केले पाहिजेत. महागाईवर भाषणे करण्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून महागाई कमी करण्यास हातभार लावला पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

नवनीत राणा यांचेही मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

उद्धव ठाकरेंना माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी हे कधी समजणार? उद्धव ठाकरे तुम्ही पेट्रोल-डिझेल बाबतचा टॅक्स कमी करणार का? करू पाहू याचा विचार न करता तुम्ही काय निर्णय घेणार? असे अनेक सवाल आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या नव्या घोषणेवरून केले आहेत. या नव्या निर्णयावरून आता विरोधकांनी महाराष्ट्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न सरू केला आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.