Photos : मुंबईकरांसाठी खास पर्वणी, बीएमसीची हेरिटेज इमारत पर्यटकांनाही पाहता येणार
मुंबई महापालिकेची हेरिटेज इमारत आता पर्यटकांना देखील पाहता येणार आहे. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना नवीन वर्षात शनिवारी आणि रविवारी मुंबई महानगरपालिका इमारतीचा हेरिटेज वॉक करता येणार आहे.
-
-
मुंबई महापालिकेची हेरिटेज इमारत आता पर्यटकांना देखील पाहता येणार आहे.
-
-
मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना नवीन वर्षात शनिवारी आणि रविवारी मुंबई महानगरपालिका इमारतीचा हेरिटेज वॉक करता येणार आहे.
-
-
राज्य सरकारचा पर्यटन विभाग आणि महानगरपालिका यांच्यात याविषयी करार झाला आहे. आज (20 डिसेंबर) सकाळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेत येऊन या बाबतचा आढावा घेतला.
-
-
मुंबई शहरामध्ये अनेक पर्यटनाची स्थळ आहेत. मुंबई बाहेरून अनेक नागरिक मुंबई शहर पाहण्यासाठी येत असतात.
-
-
मुंबई महापालिकेची ऐतिहासिक इमारत पर्यटकांना पाहता यावी यासाठी काही महिन्यांपूर्वी राज्याच्या पर्यटन विभाग आणि मुंबई महापालिका यांच्यात करार झाला आहे.
-
-
मुंबई महापालिकेची इमारत एक हेरिटेज वास्तू आहे. या इमारतीचं बांधकाम ब्रिटीशकालीन असून त्यात अनेक कला कसूरी करण्यात आल्या आहेत. हे सर्व पर्यटकांना पाहता यावं यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेने पुढाकार घेतलाय. आगामी नवीन वर्षात मुंबई महापालिकेची ही ऐतिहासिक इमारत पर्यटकांना पाहता येणार आहे.