डोंबिवलीत अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार
ठाणे : डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलावर पॉर्न व्हिडीओ दाखवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलाचे वय 9 वर्ष आहे. आरोपीचे नाव दिनेश लावहरी असे असून मानपाडा पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीमधील या 9 वर्षाच्या मुलाला आरोपी आपल्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने पीडित मुलाला अश्लील […]
ठाणे : डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलावर पॉर्न व्हिडीओ दाखवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलाचे वय 9 वर्ष आहे. आरोपीचे नाव दिनेश लावहरी असे असून मानपाडा पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डोंबिवलीमधील या 9 वर्षाच्या मुलाला आरोपी आपल्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने पीडित मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने काही दिवसांनी पुन्हा पीडित मुलाला घरी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाने नकार दिला. याच्या राग मनात धरुन आरोपीने पीडित मुलाला मारहाण केली. आपल्या मुलाला मारहाण झाल्याची माहिती मिळताच मुलाच्या पालकांनी दिनेश काकाने का मारले, अशी विचारणा केली. तेव्हा मुलाने आईला त्याच्यासोबत घडलेली घटना सांगितली. हे ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर, पीडित मुलाच्या पालकांनी मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. यासंबंधी कारवाई करत मानपाडा पोलिसांनी दिनेश लावहरी याला अटक केली.
आरोपी दिनेश त्याच्या पत्नीसोबत राहतो. हा प्रकार समोर येताच डोंबिवलीत एकच खळबळ उडाली. साहित्य संस्कृतीसाठी ओळख असलेल्या डोंबिवलीत हे काय घडते आहे? असाच प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. पालकांनी मुले कुणाबरोबर कुठे जातात, त्यांची मैत्री कुणाशी आहे याबाबत जागृक राहण्याची आवश्यकता या घटनेने समोर आली आहे.