Platform Ticket : प्लॅटफॉर्म तिकीट दर 15 दिवसांसाठी वाढवले, कुठल्या स्थानकावर किती तिकीट? वाचा

9/5/2022 ते 23/5/2022 पर्यंत 15 दिवसांसाठी ही वाढ निश्चित करण्यात आली. त्यात CSMT, दादर, LTT, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर तिकीट दरात वाढ करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

Platform Ticket : प्लॅटफॉर्म तिकीट दर 15 दिवसांसाठी वाढवले, कुठल्या स्थानकावर किती तिकीट? वाचा
प्लॅटफॉर्म तिकीट दर 15 दिवसांसाठी वाढवलेImage Credit source: google
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 7:57 PM

मुंबई : मुंबईतील काही रेल्वे स्थानकात (Railway Station) प्लॅटफॉर्म तिकिटांची (Platform Ticket) किंमत 10 ते 50 रुपयापर्यंत तात्पुरती वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात अलार्म चेन पुलिंगच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 9/5/2022 ते 23/5/2022 पर्यंत 15 दिवसांसाठी ही वाढ निश्चित करण्यात आली. त्यात CSMT, दादर, LTT, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर तिकीट दरात वाढ (Platform Ticket Rate) करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन ही लाईफलाईनची भूमिका बजावत असते. लाखो प्रवाशी रोज लोकल ट्रेनने प्रवास करतात. मात्र अलिकडे अनेक गैरप्रकार वाढले होते. साखळी खेचून ट्रेन थांबवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच रेल्वे प्रवासावरील नियमांची मर्यादा हटवल्यानंतर लोकलमधील गर्दीही बरीच वाढली होती.

गैरप्रकार वाढल्याने निर्णय

कोरोनाकाळातही प्लॅटफॉमवरील गर्दी कमी ठेवण्याासाठी आणि कोरोनाला रोखण्यासाठी तिकीटात वाढ करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा कहर अटोक्यात आल्यानंतर पुन्हा या तिकीटांचं दर कमी करण्यात आले. मात्र आता पुन्हा काही गैरप्रकार वाढल्याने आणि आता पुन्हा मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागल्याने रेल्वेकडून तिकीटदर वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता तिकीट वाढवल्यानंतर तरी गर्दी नियंत्रणात राहणार का आणि होणारे गैरप्रकार थांबणार का? हेही पाहणं तेवढच महत्वाचं आहे. अनेकदा विनातिकीट प्लॅटफॉर्मवर अनेकजण घुसताता. आता त्यांना रोखण्याचेही आव्हान रेल्वेसमोर असणार आहे. ते आव्हान रेल्वे कसे पूर्ण करणार याकडेही प्रवाशांच्या नजरा लागल्या आहे.

हे सुद्धा वाचा

तात्पुरती तिकीटदरवाढ

ही करण्यात आलेली तिकीट दरवाढ ही तात्पुरती असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा पंधरा दिवसांनंतर हे तिकीटदर कमी केले जाऊ शकतात. मात्र तरीही गैरप्रकार न थांबल्यास हे दर जैसे थेही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पंधरा दिवसांनी रेल्वे हे दर कमी करते का हे वाढवलेले दर तसेच ठेवते यावरही प्रवाशांचा खिसा अलंबून असणार आहे. सध्या तरी या वाढलेल्या दरांनी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एवढं मात्र नक्की. गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेचा या निर्णयाबाबत विचार सुरू होता. आता अखेर CSMT, दादर, LTT, ठाणे, कल्याण आणि पनवेल या गर्दी होणाऱ्या आणि प्रवाशांची सर्वात जास्त रहदारी असणाऱ्या स्थानकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.