PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच जवानाच्या कृत्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; असा उघड झाला बनाव

PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर येत आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका जवानामुळे ही गडबड झाली आहे. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच जवानाच्या कृत्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; असा उघड झाला बनाव
नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 9:11 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत. पण त्यापूर्वीच त्यांच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याविषयीची अपडेट समोर येत आहे. सध्या सुट्टीवर आलेल्या लष्करातील जवानामुळे मोठी गडबड उडाली होती. पण वेळीच ही चूक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. प्रकरणात पोलिसांनी अखेर या जवानाच्या मुसक्या आवळल्या आहेत. काय आहे हे प्रकरण, या जवानाने काय केला होता बनाव?

जवानाचा मोठा बनाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याअनुषंगाने सुरक्षा यंत्राणांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही मुंबई पोलीस आणि एनएसजी अधिकार्‍यांची खासगी बैठक होती. या बैठकीला लष्कारातून सुट्टीवर आलेल्या एका जवानाने हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. आपण एनएसजी अधिकारी असल्याचा बनाव त्याने केला.

हे सुद्धा वाचा

लष्करातील जवानाचा बनाव उघड

गोरेगावच्या नेस्को येथे सुरक्षेच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली. त्यावेळी लष्करातून सुट्टीवर आलेला रामेश्वर मिश्रा तिथे हजर झाला. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बैठकीत मिश्राने ब्लेजर, टाय अशी ड्रेसिंग करून लावली हजेरी लावली. आपण एनएसजी अधिकारी असल्याचा बनाव त्याने केला. पण त्याच्यावर अधिकाऱ्यांना संशय आला. त्याने ही बाब हेरली. त्याचवेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो फरार झाला होता.

यापूर्वी पण केला होता प्रकार

रामेश्वर मिश्राने हे कृत्य काही पहिल्यांदा केले नाही. त्याने यापूर्वी पण असाच प्रकार केला होता. प्रकरणात बैठकीतून निसटलेल्या मिश्राला वनराई पोलिसांनी अटक केली आहे. मिश्रा सध्या पोलीस कोठडीत आहे. गेल्यावर्षी पंतप्रधानांच्याच दौऱ्यात त्याने असाच बनाव केला होता. त्यावेळी पण त्याचा बनाव उघड झाला होता. गेल्यावेळी त्याला बीकेसी पोलिसांनी अटक केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या 13 जुलै रोजी मुंबईत येत आहेत. महापालिकेच्या काही प्रकल्पांचे भूमिपूजन ते करणार आहेत. तर मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव-मुलुंड या जोडरस्ता प्रकल्पातील जोड बोगद्याचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून हा बोगदा जाणार आहे.

छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.