‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटावर बंदी घालणार नाही : निवडणूक आयोग

मुंबई: पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘पीएम नरेंद्र मोदी’ 5 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देशात सध्या आचारसंहिता लागू असताना राजकीय व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या चित्रपटावर काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला होता. पण निवडणूक आयोगाने या चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. या चित्रपटातून आचारसंहितेचे उल्लघंन होत […]

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटावर बंदी घालणार नाही : निवडणूक आयोग
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

मुंबई: पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘पीएम नरेंद्र मोदी’ 5 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देशात सध्या आचारसंहिता लागू असताना राजकीय व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या चित्रपटावर काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला होता. पण निवडणूक आयोगाने या चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. या चित्रपटातून आचारसंहितेचे उल्लघंन होत नसल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने मुंबई हायकोर्टात दिलं आहे.

काही महिन्यांपूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि मनमोहन सिंह यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण येत्या 11 एप्रिलपासून महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहे. हा चित्रपट निवडणुकीदरम्यान प्रदर्शित होणार असल्याने विरोधी पक्षांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. तसेच आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी याबाबत मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. त्यामुळे हा चित्रपट लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

पण ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा असे मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले होते. तसेच याप्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करण्यात आली होती. दरम्यान यावर नुकतंच निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटातून कोणत्याही प्रकारच्या निवडणूक आचारसंहितेचे उल्लघंन होत नाही. त्यामुळे हा चित्रपट ठरलेल्या तारखेलाचा प्रदर्शित होईल.

‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका अभिनेता विवेक ऑबेरॉय साकारणार आहे. या चित्रपटाची टॅगलाईन ‘देशभक्ती ही मेरी शक्ती’ अशी आहे. नरेंद मोदींची बायोपिक असणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर 23 भाषांमध्ये रिलीज करण्यात आलं आहे. उमर कपूर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटातून मोदी यांच्या एक भाऊ, पुत्र, सेवक, नेता, योगी अश्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे.

पाहा व्हिडीओ :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.