PM Modi यांच्या मुंबई दौऱ्यावेळीच बीएमसीने मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स हटवले; शिंदे गटाला झटका…
मुंबई महानगरपालिकेकडून पोस्टर्सवरून वाद उफाळून येऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत असल्याने शिंदे गट आणि भाजपच्यावतीने जोरदार तयार करण्यात आली आहे.
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्याकडून मुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 या मार्गांसह इतर विकास कामांचे उद्घाटन केले जाणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येण्याआधी दादरमधील शिवसेना भवनसमोर आणि बांद्रा पूर्वमधील कलानगर आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मोठ मोठी कटआऊटस लावण्यात आले आहेत.
मात्र ही कटआऊट मुंबई महानगरपालिकेकडून उतरवण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये पोस्टर्सवरून वाद वाढण्याची शक्यता असल्याने हे पोस्टर्स काढण्यात येत आहेत.
मुंबई महानगरपालिकेकडून पोस्टर्सवरून वाद उफाळून येऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत असल्याने शिंदे गट आणि भाजपच्यावतीने जोरदार तयार करण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटाचे लाख ते दीड लाख कार्यकर्ते मुंबईत येण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार असल्याने अतिउत्साहा कार्यकर्त्यांनी महत्वाच्या ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आली होती मात्र यावरून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वाद होण्याची शक्यता असल्याने मुंबई महानगरपालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आता ही शिंदे गटाला मोठा झटका दिला असल्याचेही बोलले जात आहे.
शिवसेना भवनसमोर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरून कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पोस्टर्स काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र राज्यात शिंदे सरकार असतानाही पोस्टर्स उतरवण्यात आल्याने शिंदे गटाला हा मोठा झटका दिला असल्याचेही बोलले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत असल्याने भाजप आणि शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विकास पुरुष म्हणून नरेंद्र मोदी यांचे मोठ मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी रोजी जयंती आहे.
त्यामुळे ठाकरे गटाकडूनही जोरदार बॅनरबाजी केली जात आहे. त्यामुळे जोरदार बॅनरबाजीवरून जोरदार पोस्टरयुद्ध सुरु असल्याचेही दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचे फोटो दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नरेंद्र मोदी यांच्या स्वागताच्या तयारी अंतिम तयारी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी भव्यदिव्य एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे.