जेव्हा तीराच्या उपचारासाठी पीएमओही कामाला लागलं, फडणवीसांकडून मोदींचे आभार

तीरा कामतच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले असताना आता राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही तीराच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. (PM Narendra Modi Teera Kamat)

जेव्हा तीराच्या उपचारासाठी पीएमओही कामाला लागलं, फडणवीसांकडून मोदींचे आभार
तीरा कामत
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 9:02 AM

मुंबई : स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी (SMA) या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्या तीरा कामतच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले असताना आता राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही तीराच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकाराने तीरासाठी लागणाऱ्या औषधांसाठीचा 6 कोटींचा कर माफ केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे मदत करण्याची  पत्राद्वारे विनंती केली होती. फडणवीसांच्या या पत्राला मोदी यांनीही तत्काळ प्रतिसाद देत तीराच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांवरील 6 कोटींचा कर माफ केला आहे. (PM Narendra Modi waives the custom duty of medicine which are needed for the treatment of Teera Kamat)

आपत्य झाल्यानंतर आई-वडिलांना होणारा आनंद कोही औरच असतो. मात्र, मिहिर आणि प्रियांका कामत यांची मुलगी तीरा कामत ही 5 महिन्यांची झाल्यानंतर तिला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) हा दुर्धर जडला. तिच्या उपचारासाठी तब्बल 16 कोटी रुपये लागणार होते. त्यासाठी तीराच्या आईवडिलांनी फंडिंगच्या माध्यमातून हा पैसा गोळाही केला. मात्र, तीरासाठी लागणारी औषधं ही अमेरिकेहून येणार असल्यामुळे या औषधांसाठी तब्बल 6 कोटींचा आयातकर द्यावा लागणार होता. एवढी मोठी रक्कम कशी उभी करावी असा प्रश्न तीराच्या आई-वडिलांना पडला होता. तीराच्या आई-वडिलांच्या याच अडचणीची दखल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

देवेंद्र फडणवीस यांचे मोदींना पत्र

तब्बल 6 कोटींचे सीमाशुल्क लागणार असल्यामुळे ही रक्काम अदा करणे तीराच्या आई-वडिलांना अशक्यच होते. ही अडचण लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलता दाखवत 1 फेब्रुवारी रोजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींन पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी तिरासाठी लागणाऱ्या औषधांचे सीमाशुल्क माफ करण्याची विनंती केली. मोदींनीही फडणवीस यांच्या विनंतीला तत्काळ प्रतिसाद देत तीरासाठी लागणाऱ्या औषधांवरील सीमाशुल्क माफ करण्याचा आदेश 9 फेब्रुवारी रोजी जारी केला. मोदींच्या तसेच केंद्र सरकारच्या या भूमिकेचे संपूर्ण देशभरातून स्वागत होत आहे.

राज्य सरकारकडूनही कर माफ

दुर्धर आजाराने ग्रासलेल्या तीराच्या आई-वडिलांना राज्य सरकारनंनेही मोठा दिलासा दिला आहे. SMA आजारावर लागणारे इंजेक्शन अमेरिकेतून भारतात मागवण्यासाठी जे सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्यूटी भरावी लागणार होती. ती माफ व्हावी यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं कामत कुटुंबियांना एक पत्र दिलं आहे. यामध्ये कस्टम ड्यूटी माफ केल्याचं राज्य सरकारने नमुद केलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्याही भूमिकेचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले आहे.

काय आहे स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी?

स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी या आजाराला मेडिकल टर्ममध्ये SMA म्हणतात. हा आजार एकप्रकारे जेनेटिक डिसिज अर्थात जनुकीय बदलांमुळे होणारा आजार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या आजारात शरीरातील स्नायू कमकुवत होतात. सुरुवातीला हात, पाय आणि पुढे फुफ्फुसांच्या स्नायुंची शक्ती कमी होत जाते. त्याचबरोबर चेहरा आणि मानेच्या स्नायुंचं काम कमी होऊन गिळताना अडचण निर्माण होते. त्यामुळे रुग्णाला हालचाल करणंही कठीण बनतं. रुग्ण एकप्रकारे रेस्पिरेटरी पॅरलेलिससमध्ये जातो. हा आजार दिवसेंदिवस वाढत जातो.

SMA आजाराचे 4 प्रकार

स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी या आजाराचा टाईप हा जनुकीय बदल्यांच्या परिणांवरुन ठरवला जातो. त्यात,

>> स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी टाईप 1 – नवजात मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो

>> स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी टाईप 2 – जन्म झाल्यानंतर सहा महिन्यांनी

>> स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी टाईप 3 – लहान मुलांमध्येच पण कमी प्रमाणात आढळतो

> स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी टाईप 4 – पौढ व्यक्तींमध्ये आढळतो

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनीही तीरासाठी लागणाऱ्या औषधावरील कर माफ केल्यामुळे तीराच्या अपचार लवकर होण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णायमुळे तीराच्या आई-वडिलांनी जनतेचे आणि सरकारचे मनापासून आभार मानले आहेत.

इतर बातम्या :

Teera Kamat : कामत कुटुंबियांना मोठा दिलासा, तीराच्या औषधांच्या करमाफीबाबत राज्य सरकारचं पत्र

Teera kamat : चिमुकल्या तीराला वाचवण्यासाठी 16 कोटी उभारले! सीमा शुल्कामुळे उपचाराला उशीर, आई-वडिलांची धडपड सुरुच

(PM Narendra Modi waives the custom duty of medicine which are needed for the treatment of Teera Kamat)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.